घरताज्या घडामोडीमध्यरेल्वेच्या प्रवाशांना दिलासा, रेल्वेने वाढवल्या ६८ लोकल फेर्‍या!

मध्यरेल्वेच्या प्रवाशांना दिलासा, रेल्वेने वाढवल्या ६८ लोकल फेर्‍या!

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवते अनेक क्षेत्रातील नागरिकांना प्रवेश दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दी वाढली असून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजत आहे. ही गंभीर बाब लक्षात येताच मध्य रेल्वेने कोरोनाच्या संसर्ग पसरु नयेत, तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर नियम पाळण्यासाठी तब्बल ६८ लोकल फेर्‍या वाढविण्यात आलेल्या आहे. आता मध्य रेल्वेवर प्रतिदिवस एकूण ४२३ लोकल धावणार असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना मोठ्या दिलासा मिळणार आहे.

मुंबई उपनगरीय लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आली होती. याकर्मचार्‍यांकडून लोकल सेवेचा वापर होत असल्याने तो शिस्तीचा होईल आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल अशी अपेक्षा केली जात होती. पण दिवसेंदिवस अत्यावश्यक सेवेतील गर्दीही प्रवाशांची वाढत जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकते. नुकतेच १ सप्टेंबरपासून खासगी कार्यालय कर्मचार्‍यांची उपस्थिती १५ टक्क्यांवरुन ३० टक्के झाली, तर सरकारी कर्मचार्‍यांचीही उपस्थिती २० टक्यांवरुन ३० टक्के करण्यात आली. तसेच राज्य सरकारच्या विनंतीवरून सर्व सहकारी व खासगी बँकांच्या कर्मचार्‍यांना लोकल सेवेत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकल आणि बेस्ट बसेसवर मोठ्या प्रमाणात ताण आला असून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजत आहे. यापुर्वी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनासाठी तब्बल ३५५ लोकल सेवा सुरु केल्या होत्या. मात्र लोकलमध्ये होत असल्या गर्दीला लक्षात घेउुन मध्य रेल्वेने गुरुवारपासून ६८ लोकल फेर्‍या वाढविण्यात आलेल्या आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना मोठ्या दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

अशा आहे अतिरिक्त ६८ लोकल फेर्‍या

कसारा -सीएसएमटी ९ फेर्‍या

कसारा-कल्याण-सीएसएमटी ६ फेर्‍या

- Advertisement -

कर्जत- सीएसएमटी ९ फेर्‍या

ठाणे-कर्जत-सीएसएमटी २ फेर्‍या

कल्याण-कर्जत-सीएसएमटी २ फेर्‍या

अंबरनाथ-सीएसएमटी ३ फेर्‍या

कल्याण-सीएसएमटी ५ लोकल फेर्‍या

ठाणे – सीएसएमटी ४ फेर्‍या

कुर्ला- सीएसएमटी ६ फेर्‍या

पनवेल- सीएसएमटी १४ फेर्‍या

वाशी- सीएसएमटी ८ फेर्‍या


हे ही वाचा – ‘जर मी छताला लटकलेले दिसले तर ती आत्महत्या नसेल’, पायलचं धक्कादायक ट्विट!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -