मविआची सभा होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये कारस्थान, संजय राऊतांचा आरोप

संग्रहित छायाचित्र

मुंबई : रामनवमीनिमित्त काल छत्रपती संभाजीनगरगमध्ये दंगल घडवण्याचा जो प्रकार झाला तो काही ठिकाणी तो यशस्वी झाला, मात्र अनेक ठिकाणी दोन्ही धर्माच्या लोकांनी सामज्यांची भूमिका घेतल्यामुळे दंगल झाल्या नाहीत हे मला माहित आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये २ एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आहे. ती सभा होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेच्या कारणाखाली त्या सभेला परवानगी मिळू नये, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे कारण द्यायचं की वातावरण तणावपूर्ण आहे, भडका उडू शकतो आणि सभेला परवानगी नाकारायची, सभा होऊ द्यायची नाही, हे कारस्थान शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. मुंबई मालवणीमध्ये काही कारण नसताना अशाप्रकारची चकमक झाली. मात्र यापूर्वी कधी रामनवमीमध्ये हल्ले झाले नव्हते. महाराष्ट्रात सर्वत्र गुढीपाडव्याच्या यात्रा निघाल्या. तेव्हा कधी असे प्रकार घडने नाहीत.

शिवसेनेच्या सभांना खेड, मालेगावमध्ये लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळत असल्यामुळे काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हे लोक काही जणांना हाताशी पकडून वातावरण बिघडवायचा आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुप्रीम कोर्टानेही या सरकारला नपुसंक म्हटले आहे आणि कालची दंगल हा त्यांच्या नपुंसकतेचा पुरावा आहे. दंगली घडवणे, दंडलींना प्रोत्साहन देणे आणि ज्यांनी दंगली घडवल्या त्यांच्यावर कारवाई न करण्याचे काम या नपुंसक सरकारने केले आहे.

सविस्तर बातमी लवकरच