घरCORONA UPDATEमुंबईतील दोन मंत्र्यांचे मतदार संघ पूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

मुंबईतील दोन मंत्र्यांचे मतदार संघ पूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

Subscribe

मुंबईत कोरोना रुग्णांची अधिक संख्या प्रभादेवी, वरळी या जी-दक्षिण आणि धारावी, माहिम आणि दादर या जी-उत्तर विभागात असून यापैकी वरळी आणि धारावी या दोन विधानसभा क्षेत्रांमध्येच याचा संसर्ग अधिक फैलावला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची अधिक संख्या प्रभादेवी, वरळी या जी-दक्षिण आणि धारावी, माहिम आणि दादर या जी-उत्तर विभागात असून यापैकी वरळी आणि धारावी या दोन विधानसभा क्षेत्रांमध्येच याचा संसर्ग अधिक फैलावला आहे. केंद्रीय आरोग्य पथकाने नेमक्या याच भागांची पाहणी करून आपला अहवाल बनवला असला तरी संपूर्ण मुंबईतील हे दोन विधानसभा क्षेत्र असे आहेत ज्यांच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही विधानसभांचे आमदार हे मंत्री आणि पालकमंत्री आहे. मात्र, या मंत्र्यांनाच आपला विभागात कोरोनामुक्त करता येत नाही आणि याच विभागांचे पॅटर्न तयार करायला हे मंत्री महोदय निघाले आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाची दिशाभूल करतानाच एकप्रकारे या दोन्ही विभागांमधील जनतेची दिशाभूल लोकप्रतिनिधी आणि प्रशासन करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रभादेवी, वरळी या जी-दक्षिण विभागात आतापर्यंत हजाराच्या पुढे कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचलेली आहे. वरळी कोळीवाड्यात काही प्रमाणात यश मिळाले असले तरी जिजामाता नगर, मरिअम्मा नगर पाठोपाठ आता प्रत्येक बीडीडी चाळ आता कोरोनाचे माहेर घर बनू लागले आहे. त्यामुळे वरळी आणि डिलाईड रोडवरील प्रत्येक वस्ती आणि इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. मात्र, केंद्रीय पथकाला केवळ वरळी कोळीवाडा दाखवून तेथील पॅटर्नचा फुगा आमदार, मंत्री आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी फुगवण्यास सुरुवात केला असला तरी बीडीडी चाळ आणि इतर वस्तींमधील रुग्णांच्या वाढत्या संख्येने हा भ्रमाचा फुगा फुटला. एका बाजुला पॅटर्नची पूर्ण चर्चा आणि दुसरीकडे पूर्णपणे वरळी लॉकडाऊनचा सहायक आयुक्तांचा प्रस्ताव यामुळे पॅटर्नची हवाच निघून गेली आहे. या मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक केले जात असले प्रत्यक्षात मतदारांना त्यांचे अशाप्रसंगी दर्शनही न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

- Advertisement -

दुसरीकडे धारावी, माहिम आणि दादर या जी-उत्तर विभागात ८००च्या लगबग बाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहे. मात्र यातील एकट्या धारावी विधानसभा क्षेत्रातच एक महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची ६६५ वर पोहोचली आहे. यापैकी निम्मी रुग्णांची संख्या पाच दिवसांमध्ये वाढली आहे. मात्र, धारावीचा प्रत्येक कानाकोपऱ्यात कोरोनाचे रुग्ण पसरले असून वरळी पाठोपाठ धारावी हा असा मतदार संघ आहे, जिथे आता पूर्ण लॉक-डाऊनची करण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने ज्या भागांची पाहणी केली, नेमक्या त्या भागांमध्ये आता पूर्ण लॉक-डाऊन करण्याची वेळ आल्याने प्रशासन आता याठिकाणी कोणत्या पॅटर्नचा वापर करणार असा प्रश्न पडू लागला आहे. मात्र, या कोरोनाबाधित रुग्णांमुळे दोन्ही विधानसभांचे आमदार हतबल ठरताना दिसत असून काहीही करा पण ही संख्या नियंत्रणात आणा, अशी विनवणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना करताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -