Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे-कलानगर पादचारी पुलाच्या बांधकामाला सुरूवात

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे-कलानगर पादचारी पुलाच्या बांधकामाला सुरूवात

Subscribe

गेल्या अनेक महिन्यांपासून वांद्रे पूर्व येथील पादचारी पुल बंद असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली.

वांद्रे पूर्व ते कलानगर येथील पादचारी पुल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. हा पादचारी पुल बंद असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे या संदर्भातील एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मंगळवारी (ता. २२ मार्च) न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या सुनावणीनंतर या पादचारी पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. तर या सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

वांद्रे पूर्व येथून सुरु होणारा पादचारी पुल हा कलानगरपर्यंत जोडलेला आहे. कलानगर येथेच म्हाडाचे मुख्य कार्यालय असल्याने नागरिकांना आणि म्हाडा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी हा पुल सोयीस्कर ठरत होता. पण हा पादचारी पुल वापर करण्यासाठी धोकादायक असल्याने तो जमीनदोस्त करण्यात आला. दरम्यान, हा पुल जमीनदोस्त करण्यात आल्याने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच स्थानकाच्या बाहेर असलेल्या अरुंद रस्त्यावर बस आणि रिक्षांची वर्दळ अधिक असल्याने अनेकवेळा इथे अपघात देखील होत असतात.

- Advertisement -

या ठिकाणी होणारी वाहनांची कोंडी आणि यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे वकील के. पी. पी. नायर यांनी हा पादचारी पुल लवकरात लवकर उभारण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या पादचारी पुलाचा वापर करताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि गैरसोयीची कोणतीही तक्रार समोर आली नव्हती, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

दरम्यान, नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे. तसेच नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित पदपथ नसणे आणि त्यामुळे दुर्घटना होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे, हे नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. वांद्रे रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयाच्या दिशेने दररोज लाखो लोक ये-जा करत असतात. या ठिकाणी फक्त पदपथ उपलब्ध आहे. ज्यामुळे या परिसरात सतत वर्दळ असते. तसेच वाहनांचीही प्रचंड गर्दी असल्यामुळे बरेच अपघात होतात. पदपाथ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आणि कोणत्याही अडचणींविना वावरण्यासाठी असतो. यामुळे मुंबई महानगरपालिकेने वांद्रे स्थानक- कलानगर येथील पादचारी पुल नागरिकांच्या सोयीसाठी पुन्हा उभारावे, असे आदेश सुनावणीच्यादरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

वांद्रे स्थानक पूर्व ते कलानगर येथील म्हाडा कार्यालयाकडे जाणारा हा पादचारी पुल २००८ मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आला होता. मात्र, हा पादचारी पुल सुरक्षित नसल्याचे निदर्शनास येताच महापालिकेने २०१९ मध्ये हा पादचारी पुल जमिनदोस्त केला. तर अनेकदा वांद्रे पूर्व रेल्वेच्या पटरीला लागून असलेल्या झोपडपट्टींना अनेकदा आग लागल्याने तेव्हा देखील हा पुल बंद ठेवण्यात आला आहे.


हेही वाचा – राज ठाकरे आज कोणत्या मुद्द्यावर बोलणार? संदीप देशपांडे म्हणाले, अतिशय खालच्या दर्जाचं…

- Advertisment -