Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई ब्रिटिशकालीन धोकादायक पुलाच्या जागी ५ महिन्यात नवीन पुलाची निर्मिती

ब्रिटिशकालीन धोकादायक पुलाच्या जागी ५ महिन्यात नवीन पुलाची निर्मिती

Related Story

- Advertisement -

पवई परिसरातील मिठी नदीवर ब्रिटिश काळात म्हणजे १९४० च्या बांधलेला पूल अति धोकादायक झाल्याने त्याचे पाडकाम करून त्या जागेवर अवघ्या ५ महिन्यात नवीन पूल उभारण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे पालिका यंत्रणेवर स्थानिक नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा पूल वाहतुकीसाठी लगेचच खुला करण्यात आला आहे. मात्र या पुलाच्या जलद कामावरून, पालिकेने मनात आणले तर एखादे काम विक्रमी वेळेत, अत्यंत जलदगतीने कसे करता येते याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘एस’ विभागांतर्गत असणा-या पवई परिसरात मिठी नदीवर १९४० च्या सुमारास ब्रिटिश काळात बांधलेला एक जुना पूल होता. हा पूल अति धोकादायक झाल्याने डिसेंबर २०२० मध्ये तोडण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या पूल खात्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व पद्धतींचा वापर करुन केवळ ५ महिन्यांच्या अल्पावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तब्बल ३४ मीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदी असणा-या या नव्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यानंतरही पुलाचे काम जलद

- Advertisement -

या धोकादायक पुलाच्या जागेवर नवीन पूल जलद गतीने उभारण्यात आला आहे. या पुलाचे काम करताना काही कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याचा या पुलाच्या कामावर विपरीत परिणाम न होऊ देता या पुलाचे काम नियोजित वेळापत्रकापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांनी दिली आहे. सदर धोकादायक पूल पाडल्यानंतर लोकांची गैरसोय होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन पूल पाडण्यापूर्वी सदर ठिकाणी तात्पुरता भराव टाकून एक तात्पुरता रस्ता पर्यायी स्वरुपात बांधण्यात आला. या तात्पुरत्या रस्त्याची उभारणी झाल्यानंतर जुन्या पुलाचे पाडकाम करण्यात आले. नव्या पुलाचे बांधकाम हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुधारित पद्धतींचा अवलंब करण्याचे निश्चित करण्यात आले. यानुसार या नव्या पुलाचे बांधकाम अक्षरशः दिवसरात्र पद्धतीने करण्यात आले.

जुन्या पुलाची रुंदी ही केवळ ७ मीटर इतकी होती, या तुलनेत नव्या पुलाची रुंदी ही २४ मीटर इतकी आहे. म्हणजे जुन्या पुलापेक्षा हा पूल तिपटीपेक्षा अधिक रुंद आहे. तसेच पुलाची उंचीदेखील जुन्या पुलापेक्षा अधिक आहे. जुना पूल ६ मीटर उंच होता, तर नवीन पुलाची उंची ७ मीटर इतकी आहे. याबाबतची माहिती, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) तथा प्रमुख अभियंता (पूल) राजेंद्रकुमार तळकर यांनी दिली.

- Advertisement -