घरमुंबईपवई आयआयटी गेटसमोर कंटेनर उलटला; वाहतूक विस्कळीत

पवई आयआयटी गेटसमोर कंटेनर उलटला; वाहतूक विस्कळीत

Subscribe

अंधेरी, जोगेश्वरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर कंटेनर उलटला आहे. त्यामुळे अंधेरी आणि जोगेश्वरीच्या दिशेला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पवई आयआयटीच्या गेटसमोरच कंटेनर उलटला आहे. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पवई आयआयटीच्या मुख्य गेटसमोर कंटेनर उलटला. ऐन कामावर जाण्याच्या वेळी हा अपघात झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याशिवाय चाकरमान्यांना देखील या वाहतूक कोंडीमुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कंटेनरला हटवणे जरुरीचे आहे. मात्र, त्याअगोदर कंटेनरमधील सामान काढावे लागणार आहे. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनरला बाजूला करावे लागणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीतपणे चालू होण्यास अजून अर्धा ते एक तासाचा कालावधी लागणार आहे.


हेही वाचा – …तर इम्तियाज जलील यांचा औरंग्या होईल – शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -