घरमुंबईमुंबईत पावसाची संततधार सुरूच, आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत पावसाची संततधार सुरूच, आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा

Subscribe

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ड देण्यात आला आहे. शहरात काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई 7 आणि 8 जुलैला अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकल सेवा सुरळीत –

- Advertisement -

मुंबई लोकल सुरळीत असून पश्चिम रेल्वे त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूकही सुरुळीत सुरु आहे. आज दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईत आज आणि उद्या मुंबईत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

अंधेरी सबवे बंद –

- Advertisement -

पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये तीन फूटा पर्यंत पाणी भरले होते. त्यामुळे हा मार्ग वहानांसाठी आणि नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सायन, माटुंग्यात काही प्रमाणात पाणी साचल्याचे पहायला मिळाले

मुंबई महानगरपालिकेचे विशेष खबरदारी घेण्याचे आदेश  –

दोन दिवस पावसाने मुंबईत जोरदार बॅटिंग केली आहे. दिवसभर मुसळधार पाऊस मुंबईत कोसळल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत आहे. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -