घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेच्या शिपायांच्या नातेवाईकांना कंत्राटकामे; चौकशी व कारवाईची मागणी

मुंबई महापालिकेच्या शिपायांच्या नातेवाईकांना कंत्राटकामे; चौकशी व कारवाईची मागणी

Subscribe

पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, याप्रकरणी पालिकेने या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करणार आहेत.

मुंबई महापालिकेत ‘शिपाई’ या पदावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून पत्नीच्या नावाने कंपन्या स्थापून पालिकेची कंत्राटकामे मिळविल्याचे उघडकीस आले आहे. पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, याप्रकरणी पालिकेने या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे सांगितले. मुंबई महापालिकेच्या ‘एच/ पूर्व’ विभागात काम करणारा शिपाई रत्नेश भोसले याने पालिकेला अंधारात ठेवून त्याची पत्नी रिया रत्नेश भोसले हिच्या नावाने ‘आर.आर. एंटरप्राइजेस’ ही कंपनी स्थापन केली.

तसेच ‘डी’ विभागात सॉलिड वेस्ट मैनेजमेंट विभागात शिपाई पदावर काम करणारा अर्जुन नारले यानेही पालिकेला अंधारात ठेवून पत्नी अपर्णा नारले हिच्या नावाने ‘श्री एंटरप्राइजेस’ ही कंपनी नियमबाह्यपणे स्थापून या दोघांनी विभागातील ‘स्पॉट कोटेशन पद्धती’ने २०१९ ते २०२१ या कालावधीमध्ये तब्बल सव्वा दोन कोटींची कंत्राटे मिळवली व त्याची कमाई खिशात घातली. याबाबतची माहिती आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी माहितीच्या अधिकारात बाहेर काढली आहे.

- Advertisement -

रिया रत्नेश भोसले हिच्या आरआर एंटरप्राइजेस या कंपनीला पालिकेकडून ६५ लाख ३६ लाखांचे, तर अपर्णा ए.नारले हिच्या ‘श्री एंटरप्राइजेस’ कंपनीला १ कोटी ११ लाख रुपयांची कंत्राटकामे देण्यात आली आहेत. तसेच कोरोना कालावधीत कामासाठी चार चाकी व वाहने भाडेतत्त्ववार पुरवण्याचे काम या दोघांनी केले आहे. यामध्ये कोविड सेंटरमध्ये साधनसामुग्री पुरवठा करणे, पल्स ऑक्सिमीटर, आर्सेनिक एल्बम टैबलेट, वाटर प्यूरीफायर, तसेच डी वार्ड कार्यालयातील हाउसकीपिंग आदी कामे देण्यात आली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -