घरताज्या घडामोडीVideo: मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्याने सुरू केली मोफत रुग्णवाहिका सेवा!

Video: मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्याने सुरू केली मोफत रुग्णवाहिका सेवा!

Subscribe

मित्राच्या ओमनी व्हॅनला रुग्णवाहिका करून २७ मे पासून सुरू मोफत सेवा सुरू केली.

राज्यात कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७४ हजारांहून अधिक आहे. तसेच २ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. दरम्यान सध्याची परिस्थितीत लक्षात घेऊन मुंबईचे पोलीस अधिकारी तेजस सोनावणे यांनी खासगी व्हॅनलाची रुग्णवाहिका करून २७ मे पासून मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली.

पीपीई किट खरेदी करणे परवडत नसल्यामुळे ते पारदर्शी रेनकोट, हातमोजे आणि फेस शिल्ड घालून रुग्णावाहिका चालवतात. एक ज्येष्ठ नागरिक आणि एक गर्भवती महिलेसह आतापर्यंत सहा जणांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये सोडण्यास मदत केली आहे.

- Advertisement -

सोनावणे यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांना रुग्णवाहिका मिळण्यास अडचण येत असल्याचे पाहिले होते. त्यावेळेस त्याच्या डोक्यात अशाप्रकारे मदत करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी आपल्या मित्राची ओमनी व्हॅन मागितली. मग चालक आणि प्रवाशांच्या सीटमध्ये विभाजन केले आणि लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यास सुरुवात केली. त्यामुळे कफ परेडमधील रहिवाशांनी इतर कोणत्याही रुग्णवाहिकेला संपर्क साधण्यापूर्वी सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.

कधीकधी कर्तव्यावर असताना त्यांना कॉल येतो तेव्हा त्यांना मदत करण्यास कोणीही रोखत नाही. त्यामुळे ते नेहमी स्थानकाबाहेरच रुग्णावाहिका पार्क करतात आणि जेव्हा कॉल येईल तेव्हा घटनास्थळी धाव घेतात. तेजस सोनावणे यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत. तसेच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

Constable Tejas sonawane of Cuff parade police station purchased omni van and transferred into ambulance to serve the Corona patient Salute to him

Madhukar Kad ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮೇ 31, 2020


हेही वाचा – उद्या वर्षातलं दुसरे चंद्रग्रहण, जाणून घ्या कधी आणि कसं दिसणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -