कोरोनाच्या हवाई हल्ल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ

टास्क फोर्सच्या सदस्यांचे मत

Corona airstrikes increase patient numbers
कोरोनाच्या हवाई हल्ल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ

मुंबईत कोरोनाच्या लक्षणांमध्ये अचानक झालेल्या बदलामुळे कोरोना आता हवेतून पसरू लागला आहे. परिणामी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, असे मत कोरोना संबंधित टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईमध्ये गेल्या वर्षांभरापासून कोरोनाने मुक्काम ठोकला आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोनावर पालिका आरोग्य यंत्रणेने चांगल्या प्रकारे उपाययोजना करून नियंत्रण मिळवले होते. मात्र फेब्रुवारीच्या मध्यानंतर अचानकपणे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोनाच्या लक्षणांत बदल झाला. आता कोरोना हवेमधून पसरू लागला आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेकांना या कोरोनाची बाधा होत आहे. परिणामी रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांच्या बेफिकिरीपणाने कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला निमंत्रणच दिले आहे.त्यामुळेच मुंबईत दररोज ९ हजार ते त्यापेक्षाही जास्त कोरोना बाधित आढळून येत आहेत. तर दररोज ४० – ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

कोरोनाचे ‘बदललेले स्वरूप’ हेच खरे कारण आहे. ‘डबल म्युटन स्ट्रेन’मध्ये सुरुवातीचे ५ ते ७ दिवस बाधितामध्ये कोरोनाची लक्षणेच दिसत नाहीत.केवळ जवळच्या संपर्कातून पसरणारा कोरोना आता हवेतूनही जलद गतीने पसरत आहे.
त्यामुळेच दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, असे मत राज्य सरकार नियुक्त कोरोना संदर्भातील टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केले.

वर्षभरात कोरोनाचा स्ट्रेन कमालीचा बदलला आहे. आता रुग्णांमध्ये पहिल्या आठवड्यात लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे बाधित असूनही गर्दीत राहिल्याने लागण वाढत आहे. संपूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला केवळ खोकला, शिंका, थुंकी, निकट संपर्क, रुग्णाच्या संपर्कातील वस्तूवर विषाणू राहिल्याने कोरोनाची लागण होत असे ; मात्र आता सुरुवातीच्या कारणांसोबतच कोरोनाचा हवेतून प्रसार होऊ लागला आहे. एकाच वेळी अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. लोक वेदनाशामक गोळ्या घेतात, चाचण्या करण्याकडे दुर्लक्ष करतात. यामध्ये आजाराची तीव्रता वाढते आणि अनेकांना लागणही होते, असे टास्क फोर्सच्या सदस्यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत ८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, १०० सक्रिय सीलबंद इमारती