घरCORONA UPDATEमहापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह कोरोना समन्वयकांना रस्त्यांवर उतरवले!

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह कोरोना समन्वयकांना रस्त्यांवर उतरवले!

Subscribe

महापालिकेच्यावतीने रावबल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून महापालिका आयुक्तांना मदत करण्यासाठी मंत्रालयातील चार सनदी अधिकाऱ्यांना महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले.

मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने रावबल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून महापालिका आयुक्तांना मदत करण्यासाठी मंत्रालयातील चार सनदी अधिकाऱ्यांना महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. परंतु मागील सव्वा महिन्यापासून कोरोना नियंत्रण कक्षात समन्वयक म्हणून केवळ त्यांच्याकडून जबाबदारी बजावली जात आहे. प्रत्यक्षात त्यांच्या खांद्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती. त्यामुळे अखेर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह शासनाने प्रतिनियुक्ती केलेल्या या समन्वयकांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवून त्यांना प्रत्यक्षात रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरु झालेली असून महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह शासन नियुक्ती समन्वयकांना आपला परिमंडळ कोरोनामुक्त करण्यासाठी झोकून काम करावे लागणार आहे.

 

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेताना, महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांसह कोरोना नियंत्रण कक्षात समन्वयक म्हणून पाठवलेल्या सनदी अधिकाऱ्यांवर खऱ्या अर्थाने परिमंडळांची जबाबदारी सोपवली आहे. यासर्वांच्या अधिपत्याखाली परिमंडळांमधील कोरोनाचे विषाणू्चा संसर्ग रोखून उपाययोजना राखण्याचा प्रयत्न करत रुग्ण संख्या दुपटीने वाढणार नाही याबाबतची खबरदारी घेतली जाईल. यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, जयश्री भोज या चार अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या कोरोना नियंत्रण कक्षात समन्वयक म्हणून शासनाने नियुक्त केलेल्या अश्विनी भिडे, डॉ. रामास्वामी आणि मनिषा म्हैसकर आदींवर सात परिमंडळांची प्रत्येकी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व अतिरिक्त आयुक्तांना नेमून दिलेल्या परिमंडळांत दैनंदिन सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत भेटी देवून आढावा घेणे अशाप्रकारचे जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता कार्यालयात येवून व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे याचा आढावा देणे बंधनकरक केले.

 

- Advertisement -

ज्याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत, तेथील मॅपिंग करणे, बाधिताच्या संपर्कातील अति निकट व त्याखालोखाल संपर्कात असलेल्यांची माहिती व अलगीकरण, बाधित क्षेत्र, निश्चित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर योग्यप्रकारे उपचार होतात किंवा नाही याची माहिती घेणे, ताप दवाखाने, खासगी नर्सिंग होम्स, दवाखाने, रुग्णालय आदींमधील सुविधा, लक्षणे असलेल्या रुग्णांची होणारी चाचणी, हायरिस्क व लक्षणे नसलेल्यांसाठी असलेल्या क्वारंटाईनची उपलब्धता आणि त्याचा वापर तसेच सामाजिक सहभाग आदींचा आढावा  घेऊन यासर्व अतिरिक्त आयुक्तांनी कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा,असे निर्देश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी बजावले आहे.

 

विशेष म्हणजे मागील सव्वा महिन्यांपासून कोरोनावर कार्पोरेट पध्दतीने काम होत असून प्रत्यक्ष मैदानात कोणताही अधिकारी उतरत नाही. तसेच महापालिकेत कधी नव्हे तर दहा- दहा सनदी अधिकारी दिमतीला असतानाच कोरोनाचा आजार अद्यापही नियंत्रणात आणला जात नसल्याने यासर्व अतिरिक्त आयुक्तांवर परिमंडळांची जबाबदारी सोपवून त्याप्रमाणे कामाची विभागणी करायला हवी, मागणी काही दिवसांपासून होत होती. अखेर सव्वा महिन्यांनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत निर्देश दिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी याबाबत परिमंडळनिहाय जबाबदारी निश्चित केली आहे.

परिमंडळ
परिमंडळ

 

अशाप्रकारे असेल अतिरिक्त आयुक्तांवर परिमंडळांची जबाबदारी

 

परिमंडळ १ : आबासाहेब जऱ्हाड

परिमंडळ २ : मनिषा म्हैसकर

परिमंडळ ३ : डॉ. रामास्वामी

परिमंडळ ४: सुरेश काकाणी

परिमंडळ ५ : जयश्री भोज

परिमंडळ ६ : अश्विनी भिडे

परिमंडळ ७ : पी.वेलरासू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -