घरCORONA UPDATECorona Update: मुंबईत २४ तासांत १,४०६ नव्या रुग्णांची वाढ, ४२ जणांचा मृत्यू!

Corona Update: मुंबईत २४ तासांत १,४०६ नव्या रुग्णांची वाढ, ४२ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबई गेल्या २४ तासांत १ हजार ४०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनोबाधितांची संख्या १ लाख ३४ हजार २२३ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ३५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईत १२३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत १ लाख ८ हजार २६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

३१ रूग्णांना काही दिर्घकालीन आजार होते. आज झालेल्या ४२ रुग्णांचा पैकी ३० रुग्ण पुरुष आणि १२ रुग्ण महिला होत्या. यापैकी मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३ जणांचे वय ४० वर्षाखाली होते. तर २८ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. तर उर्वरित ११ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. २० ऑगस्टपर्यंत ६ लाख ८८ हजार ८७६ कोविड चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत दुप्पटीचा दर ८९ दिवस आहे.

राज्यात ११,७४९ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ७४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४ लाख ९२ हजार ९६६ नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के एवढा असून राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३५ हजार १३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात १ लाख ६४ हजार ५६२ रुग्ण Active आहेत.


Corona Update: राज्यात ११,७४९ नव्या रुग्णांची नोंद, ३३९ जणांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -