घरमुंबईधर्म, जाती आणि निवडणूकांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा - राऊत

धर्म, जाती आणि निवडणूकांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा – राऊत

Subscribe

देशात कोरोनाचं संकट कायम असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होताना दिसतेय. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी साधला. यावेळी त्यांनी कोरोनामुळे देशाची परिस्थिती गंभीर असून ही परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे सांगितले. तर अशा परिस्थितीत कोणताही भेदभाव न करता सर्वांनीच कोरोनाच्या परिस्थितीत एकत्र येणं गरजेचं आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. यासह कोरोनाचं संकट म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध नाहीये हे देशांतर्गत युद्ध आहे. सर्वसामान्यांपासून बड्या व्यक्ती देखील कोरोनाशी झुंज देताय. त्यामुळे अशा परिस्थितीत भेदाभेव करणं योग्य नाही. तर धर्म, जाती आणि निवडणूकांपेक्षा लोकांचा जीव वाचणं अधिक महत्त्वाचं असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

केंद्र आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून निर्णय घेतं

तसेच, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘देशातील कोरोना परिस्थितीचं पुरेसं गांभीर्य नाही. सध्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात लॉकडाऊन लागू करावा लागेल का, याचा विचार करण्यात आला पाहिजे. मात्र, केंद्र सरकार प्रत्येकवेळी आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून निर्णय घेते.’ निवडणुका आहेत म्हणून माणसं मारता येणार नाही, अशी टीका देखील राऊत यांनी केली. तर निवडणुका आणि राजकारण यापेक्षा लोकांचे जीव महत्त्वाचे आहे, असेही ते म्हटले. भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. त्याठिकाणी कोरोना नाही, असे मुळीच नाही. तर थोड्याच दिवसांत तेथे भयावह चित्र समोर येईल, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

राजकीय भूमिकेमुळेच फडणवीसांचा विरोध

महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास देवेंद्र फडणवीसांचा असलेला विरोध हा भाजपच्या राजकीय भूमिकेमुळेच, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे सध्या केंद्र सरकार स्वत:च्या पक्षाचा स्वार्थ पाहत आहे. मात्र, उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थितीत केला.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -