घरमुंबईCorona in Mumbai: मुंबईत कोरोनाचे ४ हजार ७४४ सक्रिय रुग्ण

Corona in Mumbai: मुंबईत कोरोनाचे ४ हजार ७४४ सक्रिय रुग्ण

Subscribe

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे; मात्र कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सतर्क व सज्ज आहे. गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे ६ बळी गेले असून ३४७ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ४२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोनाचे ४ हजार ७४४ रुग्ण सक्रिय आहेत.

पालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, सध्या तरी कोरोनाचा फारसा उद्रेक झालेला नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या २५ तासात विविध रुग्णालयात कोरोनामुळे गंभीर प्रकृती असलेल्या ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या १६ हजार २८ इतकी झाली आहे. गेल्या मार्च २०२० पासून ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत म्हणजे गेल्या १९ महिन्यात कोरोनामुळे १६ हजार २८ रुग्णांचा म्हणजेच दरमहा सरासरी ८४३ रुग्णांचा बळी गेला असून दररोज सरासरी २८ रुग्णांचा बळी गेला असंल्याची माहिती समोर येते.

- Advertisement -

त्याचप्रमाणे, गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाची बाधा झालेल्या ३४७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३५ हजार ४०३ वर गेली असून त्यापैकी ७ लाख १२ हजार १६२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

उर्वरित ४ हजार ७४४ सक्रिय रुग्णांवर पालिका, सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, गेल्या २४ तासांत कोरोनाग्रस्त रुग्णांचा शोध घेण्यासाठी २५ हजार ५८१ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत कोरोनाच्या ९७ लाख ४१ हजार ४५५ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -