घरमुंबईकोरोना रोखण्यासाठी पालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन; कोविड सेंटर्ससाठी पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार

कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन; कोविड सेंटर्ससाठी पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार

Subscribe

राज्यातील दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. पालिकेने नवा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. पालिका पुन्हा एकदा कोविड सेटर्समध्ये वाढ करणार आहे. यासाठी पंचतारांकित हॉटेल्स पालिका ताब्यात घेणार आहे, असं पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं.

मुंबई महापालिका मुंबईतील पंचतारांकीत हॉटेल्स ताब्यात घेऊन त्यांचं कोविड सेंटर्समध्ये रुपांतर करणार आहे. याठिकाणी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी केला जाईल. तसेच या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे नोडल अधिकारी दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत काम पाहतील. वॉर रूमचे नोडल अधिकारी आणि जम्बो कोविड सेंटरचे अधिकारी एकामेकांच्या सतत संपर्कात असतील.

- Advertisement -
  • सर्व कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब्सना रिपोर्ट देण्यासाठी २४ तासांचा अवधी मिळणार आहे. सर्वांत आधी लक्षण असलेल्या कोरोना रूग्णांचा रिपोर्ट द्यावा लागणार आहे.
  • काही पंचताराकित हॉटेल्सचं कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांकडे ही केंद्र चालवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात येणार.
  • रात्री ११ ते सकाळी ७ दरम्यान सर्व खाटांचे वाटप प्रामुख्याने फक्त जंबो फिल्ड हॉस्पिटलमध्ये आणि वॉर्ड वॉर रूम्स आणि अनुक्रमे नोडल अधिकाऱ्यांकडून रात्री संपूर्ण फास्ट ट्रॅक बेड वाटप केलं जाईल. कोरोना रुग्णांसाठी बेडस कमी पडत असल्याने मुंबईच्या २४ वॉर्डसमध्ये काही हॉटेल्स ताब्यात घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून रुग्णालये आणि कोव्हिड सेंटरमधील बेडस संपल्यास या हॉटेल्सचा वापर करता येईल.
  • मुंबईत आणखी ३२५ आयसीयू बेडस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच नोडल अधिकारी खासगी रुग्णालयांमध्ये काही पेशंटस विनाकारण आयसीयू किंवा ऑक्सिजन बेडस अडवून ठेवत आहेत का, याचाही आढावा घेतील. जेणेकरून गंभीर अवस्थेतील रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येणार नाहीत.
  • पालिका येत्या ७ दिवसांत १२५ आयसीयूसह ११०० अतिरिक्त डीसीएचसी / डीसीएच कोविड बेड उपलब्ध करणार.
  • सरकारने येत्या ५ ते ६ आठवड्यांत मुंबईत तीन वेगवेगळ्या ठिकाणी आणखी तीन जंबो फील्ड रुग्णालये तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये २०० आयसीयू बेड आणि ७० टक्के ऑक्सिजनयुक्त बेड असलेल्या २००० बेडची क्षमता असणार आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -