घरCORONA UPDATEBreaking: कोरोनाच्या काळात लुटालूट; कोरोनाचे कमिशन कुणाच्या घशात

Breaking: कोरोनाच्या काळात लुटालूट; कोरोनाचे कमिशन कुणाच्या घशात

Subscribe

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात सापडले आहेत. त्यामुळे मुंबईत पॉझिटिव्ह रुग्ण आढळणाऱ्या परिसरातील लोकांना तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. तिथे क्वारंटाईन केलेल्या लोकांना दोन वेळचे जेवण, नाश्ता आणि चहा देण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र मुंबईत वेगवेगळ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कंत्राटदाराला वेगवेगळे दर दिलेले आहेत. तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये दिले जाणारे अन्नही निकृष्ट दर्जाचे असल्याचे तेथील लोक सागंत आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री क्वारंटाईनचे कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धा करत असून कोरोना कमिशनची लूट होत असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सौमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी मुंबईतील विविध ठिकाणच्या क्वारंटाईन सेंटरला जाऊन भेट दिली. वेगवेगळ्या क्वारनंटाईन सेंटरमध्ये कंत्राटदाराला वेगवेगळे जेवणाचे दर दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व उपनगरात दिवसाचे प्रती व्यक्ती प्रती दिन १७२ रु, धारावी दादरमध्ये ३७२ रु, ठाण्यात ४१५ रुपयांचे कंत्राद दिलेले आहे. एवढे महागडे कंत्राट देऊन सुद्धा जेवणाचा दर्जा अतिशय खराब असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisement -

कंत्राटदार मालामाल, पीडित बेहाल

क्वारंटाईन सेंटरमध्ये संशयित रुग्णांना १४ दिवसांसाठी ठेवले जाते. याठिकाणी त्यांना सकाळी नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाते. तसेच एकवेळ चहा दिला जातो. बंद पाकिटातून हे जेवण कम्युनिटी किचनद्वारे कंत्राटदार पुरवित असतो. मात्र अनेक क्वारंटाईन सेंटरमधील लोकांनी जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केलेली आहे. जेवणाचा दर्जा निकृष्ट असून जेवणाचे दर वेगवेगळे कसे? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. तसेच पालिकेच्या या कारभारामुळे कंत्राटदार मालामाल झाले असून पीडित मात्र बेहाल झाले असल्याची टीका करताना त्यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली.

kirit somaiya letter to rajesh Tope
किरीट सोमय्या यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र

kirit somaiya letter to health minister rajesh Tope

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -