घरताज्या घडामोडीकोरोनामुळे २०१ पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू; वारसांना नोकरी व आर्थिक मदत

कोरोनामुळे २०१ पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू; वारसांना नोकरी व आर्थिक मदत

Subscribe

पालिका प्रशासनाने पालिकेच्या मृत कर्मचाऱ्यांपैकी ६२ वारसदारांना पालिकेत नोकरी दिली आहे. ६७ वारसदार कुटुंबांना प्रत्येकी ५० लाखाची आर्थिक मदत करून मोठा आधार दिला आहे.

मुंबई महापालिकेच्या २०१ अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र पालिका प्रशासनाने या मृत कर्मचाऱ्यांपैकी ६२ वारसदारांना पालिकेत नोकरी दिली त्याचप्रमाणे  ६७ वारसदार कुटुंबांना प्रत्येकी ५० लाखाची आर्थिक मदत करून मोठा आधार दिला आहे. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमुळे जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढला. मुंबईतही कोरोनाबधितांच्या संसर्गामुळेच कोरोनाचा फैलाव झाला. गेल्या मार्च २०२० पासून सुरू झाला. मुंबईत बेसावध नागरिकांमुळे कोरोनाचा फैलावर वाढला.

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रीय, राज्य स्तरीय यंत्रणा आणि मुंबई महापालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरली. यामध्ये पालिका रुग्णालये, रुग्णालय स्टाफ, डॉक्टर, नर्स आदींसह, सफाई खाते, कीटकनाशक विभाग, घनकचरा विभाग आदी खात्यातील अधिकारी, कर्मचारी हे ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले. पालिकेची सेवा बजावताना पालिकेच्या विविध खत्यातील ६ हजार २८७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर पालिकेच्या विविध रुग्णालयात आतापर्यंत कोरोनाशी लढा देणाऱ्या २०१ अधिकारी, कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

त्यामुळे पालिकेने केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, मृत कर्मचारी, अधिकारी यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत करण्यात आले. तर कोरोना विरोधातील या लढ्यात रुग्णालयात यशस्वी उपचार घेऊन ५ हजार ३६३ अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ते आज कुटुंबियांसोबत राहत आहेत तसेच, आजही प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत.


हेही वाचा – पालिका लपवत आहे ५० खाटा; ईएनटी रुग्णालय कोविड करण्याकडे दुर्लक्ष

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -