घरCORONA UPDATECorona Live Update : Corona Update: राज्यात १२,२४८ नव्या रुग्णांची नोंद, ३९०...

Corona Live Update : Corona Update: राज्यात १२,२४८ नव्या रुग्णांची नोंद, ३९० जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात १२,२४८ नव्या रुग्णांची नोंद, ३९० जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार २४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख १५ हजार ३३२वर पोहोचला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.२५ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यदर ३.४५ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

गणपतीसाठी गावी येणार्‍यांना क्वारंटाईन व्हावेच लागणार!

येत्या २२ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival in Konkan) बाहेरगावाहून येणार्‍यांना १० ते १४ दिवसांपर्यंत क्वारंटाईन व्हावे लागणार असून, त्यासाठी नागोठणे विभागातील, तसेच पाली ग्रामपंचायतीने नियमावली जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देण्यावरून आणि ती कोणत्या नियमांच्या आधारे दिली जावी यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाली ग्रामपंचायतीने आणि नागोठणे विभागातील इतर काही गावांनी जाहीर केलेली नियमावली महत्त्वाची ठरली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

Corona: कोरोनावरील वॅक्सिन जादूच्या कांडीप्रमाणे काम करणार नाही – WHO

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वच देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत असून अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. या विषाणूवर औषध काढण्याचे सर्वच देशात प्रयत्न सुरु असून काही महिन्यात या कोरोना विषाणूवर वॅक्सिन येण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक इशारा दिला आहे. त्यांच्या म्हण्यानुसार, ‘जगभरात अनेक ठिकाणी बऱ्याच कोरोना लसनिर्मिती फेज-३ मध्ये असून क्लिनिकल चाचणी सुरू आहेत. यामुळे लोकांमध्ये कोरोनापासून वाचवण्यासाठीची आशा निर्माण झाली आहे. पण, सध्या तरी कोरोनाची लस जादूच्या कांडीसारखं काम करणार नाही आणि कदाचित कधीच नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस दिला आहे. (सविस्तर वाचा)


Corona Virus : राज्यात सध्या कम्युनिटी प्रसार नाही – राजेश टोपे

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, रविवारी कोरोना आढावा बैठक पार पडली. जवळपास तीन तास झालेल्या या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांना कोरानाच्या पार्श्वभूमीवर काय सूचना दिल्या, याबाबत माहिती दिली. दरम्यान, राज्यात सध्या कम्युनिटी प्रसार नाही, असेदेखील राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. (सविस्तर वाचा)


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती एका भाजपा नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करत दिली. पण, काही वेळातच त्यांनी ते ट्विट डिलीट केल्याने अमित शाह कोरोनामुक्त की अद्याप करोनाग्रस्त याबाबतचा संभ्रम कायम आहे.


देशात एक दिवसात ६४ हजार ३९९ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ८६१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २१ लाख ५३ हजार ०११ पैकी ६ लाख २८ हजार ७४७ इतक्या अॅक्टिव्ह केसेस असून यामध्ये आतापर्यंत १४ लाख ८० हजार ८८५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४३ हजार ३७९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. सविस्तर वृत्त


अभिनेता संजय दत्त यांना काल रात्री उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे लीलावतीमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे संजय दत्त यांना लीलावती रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. सविस्तर वाचा 


Coronavirus Maharashtra: कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५ लाखांच्या वर पोहोचला

राज्यात आज १२,८२२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५,०३,०८४ झाली आहे. तर १,४७,०४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या १७ हजार ३६७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -