घरमुंबईकोरोनामुळे राजकारणीही बसले घरात, पण सर्वसामान्याना कधी कळणार?

कोरोनामुळे राजकारणीही बसले घरात, पण सर्वसामान्याना कधी कळणार?

Subscribe

ज्या राजकीय नेत्यांना नेहमी रस्त्यावर बघत असता ते राजकिय नेते देखील सध्या आपापल्या घरात बसूनच मतदारसंघात मदत करत आहेत. मग तुम्ही का घरात बसत नाहीत!

राज्यासह देशात सध्या कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉक डाऊनची घोषणा केली. मात्र ब्लॉक डाऊनच्या काळात देखील सर्वसामान्य जनता खुलेआम रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यसरकार सह केंद्र सरकार देखील अशा लोकापुढे हतबल झाले आहे. पण नागरिकहो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ज्या राजकीय नेत्यांना नेहमी रस्त्यावर बघत असता ते राजकिय नेते देखील सध्या आपापल्या घरात बसूनच मतदारसंघात मदत करत आहेत. मग तुम्ही का घरात बसत नाहीत घरात असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होत आहे.

गर्दी टाळण्याकडे नेत्यांचा भर 

एखादा मंत्री, आमदार, खासदार किंवा नगरसेवक म्हटला की त्यांच्या अवती भवती त्यांचे पीए, बॉडी गार्ड, एक दोन पोलीस आणि काही कार्यकर्ते असतात. मात्र सध्या राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्याकडे असलेल्या बऱ्याच कामगार वर्गाला सुट्टी दिली असून, हे राजकीय नेते मतदारसंघात देखील फिरत नाहीत. याबद्दल काही आमदार आणि खासदारांशी खासगीत बोलले असता त्यांनी सांगितले की, जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर आमच्या अवतीभवती गर्दी जमणार आणि हीच गर्दी टाळण्यासाठी आम्ही घरात राहणं पसंत करतो.तसेच आमच्या मतदार संघात जी काही मदत लागेल ती घरातूनच आम्ही पुरवतो. विशेष बाब म्हणजे मतदारसंघातील आमचे कार्यकर्ते कामाला देखील लागले असून, ते देखील सोशल डिस्टसनचे पालन करत असल्याचे या नेत्यांनी बोलताना सांगितले. विशेष बाब म्हणजे काही नेते हे सध्या आपल्या कुटूंबासोबत एकतर घरी वेळ घालवत आहेत किंवा आपापल्या फार्म हाऊसवर थांबले आहेत.

- Advertisement -

मत्र्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी 

दरम्यान राज्यातील मंत्री जरी कोरोनावर बारकाईने लक्ष ठेवून असले तरी त्यांनी देखील सध्या आपल्या अवती भवती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. विशेष म्हणजे हे सर्व मंत्री पत्रकार परिषद देखील घेणे सध्या टाळत असून, एखादी माहिती जनतेपर्यत पोहोचावयाची असेल तर सोशल मीडियाचा वापर करून हे नेते माहीती देत आहेत. एवढेच नाही तर खुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हे देखील आढावा घ्यायचा असेल काही ठराविक अधिकाऱ्यांना बोलावून आढावा घेत आहेत. दरम्यान राज्यातील बर्याच मंत्र्यांनी आपल्याकडील कामगार वर्गाला सुट्टी दिली आहे.


जगभर Coronavirus पसरवणारा पहिला रुग्ण सापडला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -