घरCORONA UPDATEबाहेर फिरणाऱ्यांची आता काय आरती करायची का? खरंच पोलिसांनी आरती केली की!

बाहेर फिरणाऱ्यांची आता काय आरती करायची का? खरंच पोलिसांनी आरती केली की!

Subscribe

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना पोलीस, प्रशासन, सरकारने हर तऱ्हेने समजावून पाहिलं. आधी विनवणी केली. नंतर हातात दंडुका घेतला. आर्थिक दंड केला. उठाबशा काढायला लावल्या. कोलांटउड्या मारायला लावल्या. पण अजूनही अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्यांना अक्कल आल्याचं काही दिसून येत नाहीये. अशा परिस्थितीत अशा लोकांची आता काय आरती करायची का? असा वैतागलेला प्रश्न साहजिकच पडू शकतो. पण आता महाराष्ट्र पोलिसांनी तोही उपाय करून बघून म्हणून या बाहेर फिरणाऱ्यांची चक्क आरतीच केली आहे. ठाण्यात सोमवारी विनाकारण घराबाहेर पडून यंत्रणांवरचा ताण वाढवणाऱ्या नागरिकांची आरतीच केली. याचा व्हिडिओ एएनआयने ट्वीट केला आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये पोलीस बाहेर फिरणाऱ्यांना दंड किंवा दंडुक्याचा प्रसाद न देता चक्क आरती करताना दिसत आहेत. शिवाय, ही माणसं देखील शांतपणे आपली आरती करून घेतायत! किमान आता तरी या लोकांना शहाणपण येईल आणि ते घरातच थांबतील, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. याआधीही फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गांनी अशा ‘मोकाट’ फिरणाऱ्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला आहे. मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये तर चक्क एक पोलीस हवालदार स्वत:च यमराजाचा अवतार घेऊन रस्त्यावर हजर झाला!

- Advertisement -

तर कुठे चक्क तापलेल्या रस्त्यावर मगर होऊन सरपटण्याची शिक्षा पोलिसांनी ठोठावली! – सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

काही पोलीस अधिकाऱ्यांनी तर स्वत: हातात माईक घेऊन जनजागृती करायला सुरूवात केली. किमान त्यामुळे तरी हे सगळ्या ‘टूरिस्ट’ घरात थांबतील, या अपेक्षेने!

कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी पोलिसांने गायलेलं गाणं, एकदा ऐकाच

'आलाय हा कोरोना… जीवघेणा' | पोलीस दादा आता गाण्यातूनही सांगतोय. आता तरी घरी बसा ना…

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 19, 2020

एकूणच काय, तर शक्य ते हर तऱ्हेचे प्रयत्न पोलीस करताना दिसत आहेत. आता त्या पोलिसांना साथ द्यायची की त्यांचं काम वाढवा करून ठेवायचं, याचा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -