घरमुंबईराज्यात कोरोनाचा उद्रेक; दुसऱ्या लाटेसाठी FDA सज्ज

राज्यात कोरोनाचा उद्रेक; दुसऱ्या लाटेसाठी FDA सज्ज

Subscribe

राज्यात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसतंय. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता आणि बाधितांची वाढती संख्या बघता राज्यात कोरोनाची दुसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) देखील सज्ज आहे. कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असणारी औषधे प्रामुख्याने रेम्डेसिवीर इंजेक्शन, मेडिकल ऑक्सिजन, मास्कसह हँड सँनिटायझरच्या विभागनिहाय उपलब्धतेबाबत आढावा बुधवारी अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आला.

यावेळी आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व विभागाच्या सह आयुक्त (औषधे), सहायक आयुक्त (औषधे) यांना स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य यंत्रणा यांचेशी समन्वय ठेवून कोरोनाच्या उपचारासाठी लागणारे मेडिकल ऑक्सिजन, औषधे तसेच प्रतिबंधात्मक फेस मास्क व हँड सँनिटायझरच्या उपलब्धतेसह रास्त दराने उपलब्ध होण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तर कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी सर्व औषधे, मेडिकल ऑक्सिजन, N-९५, २ प्लाय व ३ प्लाय फेस मास्कसह हँड सँनिटायझर इत्यादींचा तुटवडा, काळाबाजार बाबत काही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ या क्रमांकावर कळविण्याचे आवाहन आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी केले.

- Advertisement -

राज्यात कोविड रुग्णालय व औषध वितरक यांच्या स्तरावर Remdesivir Inj – ५१ हजार ४२५ Favipiravir Tablets २००/४०० mg- २०,१५,३८१, औषधांचा साठा उपलब्ध आहे. या शिवाय मायलन लँब या उत्पादकाच्या नागपूर डेपो मध्ये १.९७ लक्ष Remdesivir Inj – चा साठा वितरणा साठी उपलब्ध आहे. राज्यात आज कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनचा पुरेशा साठा व नियमित पुरवठा कोरोना रुग्णालये व इतर रूग्णालयास सुरु असल्याचेही डॉ राजेंद्र शिंगणे, मंत्री , अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.  दरम्यान, डॉ राजेंद्र शिंगणे, मंत्री , अन्न व औषध प्रशासन हे नियमितपणे राज्यातील कोरोनावरील उपचारांसाठी लागणाऱ्या औषधाच्या उपलब्धतेचा आढावा घेत असून आवश्यक दिशानिर्देश प्रशासनास देत आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -