घरCORONA UPDATEइमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत कोरोना रुग्णाची आत्महत्या!

इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत कोरोना रुग्णाची आत्महत्या!

Subscribe

टाटा आमंत्रा येथे कोरोना रूग्णाची आत्महत्या

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णांकरीता विलगीकरण व कोरोना वर उपचार करण्याकरिता रुग्णांसाठी या ठिकाणी उपाययोजना करण्यात आली असतानाच आज(१९जुलै) दुपारी साडे चारच्या सुमारास टाटा आमंत्रा येथे उपचार घेत असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भिवंडी बायपास जवळील टाटा आमंत्रा येथे कोरोना ग्रस्तांसाठी येथे उपचारार्थ ठेवण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी एका रुग्णाच्या चहाच्या कपात गांडूळ आढळून आलं होतं. पालिका प्रशासनाने याबाबत सारवासारवी केली होती. भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा येथील कोरोनाग्रस्त उपचार घेत होता. आज साडे चारच्या सुमारास या रुग्णाने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

- Advertisement -

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने उभारलेल्या कोरोना सेंटर मध्ये मानसिक संतुलन बिघडली असल्याची चर्चा रुग्णांमध्ये होऊ लागली आहे. याबाबत टाटा आमंत्रा येथील डॉक्टर दिपाली साबळे यांच्याशी संपर्क साधला असता आत्महत्या संदर्भात आत्ताच मला कळाले असल्याचे सांगून अधिक माहिती सांगण्यास त्यांनी नकार देऊन आयुक्तांशी बोलावे असे सांगितले. दरम्यान कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

दरम्यान टाटा आमंत्रा येथील मॅनेजर व पालिकेचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांना विचारणा केली असता सदर रुग्णाचे नाव प्रशांत कुंडलीक आंबेकर असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत करोणा ग्रस्त रुग्णाचे मानसिक संतुलन बिघडले होते अशी ही चर्चा या ठिकाणी सुरु आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांना याबाबत माहिती मागितली असता मला काहीच याबाबत माहिती नसून टाटा आमंत्रा येथील पालिकेचे मॅनेजर व कार्यकारी अभियंता घनशाम नवांगुळ यांच्याशी बोलून मग प्रतिक्रिया देतो असे सांगितले. दरम्यान पालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सदरचा रुग्ण मानसिक तणावाखाली असल्याने त्यांने आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती त्यांनी “आपलं महानगर” शी बोलताना दिली आहे.

- Advertisement -

याबाबत घडलेला आत्महत्येचा प्रकार चिंताजनक असून रुग्णाकडे पालिका व पोलीस प्रशासन का लक्ष देत नाही याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.


हे ही वाचा – Video – पत्नीने हातगाडीतून स्मशानात नेला पतीचा मृतदेह!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -