घरCORONA UPDATEशताब्दी रुग्णालयातून बेपत्ता कोरोनाग्रस्ताचा बोरिवली स्थानकावर सापडला मृतदेह!

शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता कोरोनाग्रस्ताचा बोरिवली स्थानकावर सापडला मृतदेह!

Subscribe

मिशन बिगीन अगेनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मुंबईतलं जनजीवन हळूहळू सुरू होऊ लागलं असतानाच एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या कांदीवलीतल्या शताब्दी हॉस्पिटलमधून सोमवारी सकाळी अर्थात ८ जून रोजीपासून बेपत्ता झालेल्या एका ८० वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी बोरीवली रेल्वे स्थानकावर सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांना धक्का बसला असून त्यांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. ही वृद्ध व्यक्ती मालाडमधली रहिवासी असून गेल्या तीन दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू होते.

हे वृद्ध आजोबा सोमवारी सकाळी अचानक रुग्णालयातून गायब झाले. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालय प्रशासनाला याविषयी अजिबात कल्पना नव्हती. शेजारच्या बेडवर असलेल्या रुग्णाने रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांची शोधाशोध सुरू झाली. मात्र, रुग्णालयात आजोबांचा कुठेच पत्ता नव्हता. रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील शेजारच्या रुग्णानेच मोबाईळ फोन उचलून ते गायब झाल्यीच माहिती दिली. गंभीर बाब म्हणजे नातेवाईकांनी याविषयी रुग्णालयाकडे विचारणा केली असता रुग्ण पळून गेल्याचं सांगण्यात आलं. लागलीच सीसीटीव्ही फूटेज देखील तपासण्यात आलं नसल्यामुळे आता नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.

या सर्व प्रकाराची माहिती आत्तापर्यंत नव्हती. आता या प्रकाराची चौकशी केली जाईल. जर हलगर्जीपणा आढळला, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.

किशोरी पेडणेकर, महापौर

- Advertisement -

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या रुग्णालयांमधून कोरोना रुग्णांचे मृतदेह देखील गायब होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंदर्भात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून याविषयी रुग्णांची याद आणि संबंधित रुग्णालयांची नावेच सादर केली आहेत.

kirit somiyya letter

- Advertisement -

या घटनेच्या चौकशीसाठी आता सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, त्यासोबतच आता घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातून देखील आता एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेहच गायब झाल्याची घटना देखील समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -