घरCORONA UPDATECorona: मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी चाळीशी पार!

Corona: मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी चाळीशी पार!

Subscribe

मुंबईत कोरेाना बाधित रुग्ण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने आता चाळीशी पार केली असून बुधवारच्या आकडेवारीनुसार हा कालावधी आता ४१ दिवसांवर पोहोचलेला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दहा दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३० दिवसांवरुन ४१ दिवसांवर पेाहोचलेला पाहायला मिळत आहे. मात्र, त्याबरोबरच रुग्ण दरवाढीची सरासरी ही २.३० टक्क्यांवरून आता १.७२ टक्क्यांवर पोहोचली आहे.

वांद्रे पूर्व ते सांताक्रुझ पूर्व इत्यादी परिसरांचा समावेश असलेल्या ‘एच पूर्व’ विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल ९७ दिवस एवढा झाला आहे. तर या खालोखाल प्रामुख्याने माटुंगा परिसराचा समावेश असलेल्या ‘एफ उत्तर’ विभागात ९१ दिवस, भायखळा परिसराचा समावेश असलेल्या ‘ई’ विभागात ७६ दिवस, कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागात ७३ दिवस; तर फोर्ट – कुलाबा या परिसरांचा समावेश असलेल्या ‘ए’ विभागात ६९ दिवस एवढा झाला आहे.

- Advertisement -

रुग्णवाढीचा दर होतोय कमी

मुंबईतील रुग्णांची वाढ होण्याच्या प्रती १०० रुग्णांमागील दर हा जेवढा कमी असेल तेवढे सकारात्मक व चांगले असल्याचे द्योतक आहे. दि. १७ जून २०२० रोजी दिवस अखेरीस हा दर सरासरी २.३० टक्के एवढा होता. या दरात आता ‘सकारात्मक घट’ नोंदविण्यात आली असून हा दर आता सरासरी १.७२ टक्के एवढा झाला आहे. सध्या सर्वात कमी दर हा ‘एच पूर्व’ विभागामध्ये ०.७ टक्के एवढा नोदविण्यात आला आहे. या खालोखाल ‘एफ उत्तर’ विभागात ०.८ टक्के आणि ‘ई’ विभागात ०.९ टक्के एवढा नोदविण्यात आला आहे. सर्व २४ विभागांपैकी १७ विभागांमधील सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा हा २ टक्क्यांपेक्षा कमी आहे, उर्वरित ७ विभागांपैकी ५ विभागांमध्ये हा दर ३ टक्क्यांपेक्षा कमी, तर २ विभागांमध्ये हा दर ४ टक्क्यांपेक्षा कमी नोंदविण्यात आला आहे.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी

२२ मार्च २०२० : ३ दिवस

- Advertisement -

१५ एप्रिल २०२० : ५ दिवस

१२ मे २०२० : १० दिवस

२ जून २०२०: २० दिवस

१६ जून २०२० : ३० दिवस

२४ जून २०२० : ४१ दिवस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -