धक्कादायक! प्रभादेवीत कोरोना पॉझिटिव्हचे १२ रुग्ण

प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील एका सोसायटीत राहणाऱ्या १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

coronavirus
कोरोना व्हायरस

प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील एका सोसायटीत राहणाऱ्या १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या १२ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सार्वजनिक आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या इमारतीत एक महिला आधी पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर या इमारतीतील लोकांची तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची महिती मिळत आहे.

यापूर्वी देखील दक्षिण मुंबईतील कॉरपोरेट ऑफिसेसना जेवणाचे डबे पोहोचवणारी एक ६५ वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच काही लोकांना शोधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक देखील काम करत आहे.

जगभरात मृत्यूची संख्या

जगभरात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या रविवारपर्यंत ३१ हजार ४१२ इतकी होती. हा आकडा २४ तासात वाढला असून सद्यस्थितीनुसार जगभरात ३३ हजार ९७६ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासाच ही संख्या २ हजार ५६४ ने वाढली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या

आतापर्यंत जगात ७ लाख २२ हजार १९६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही आकडेवारी पाहून अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या

जगभरात कोरोनाची लागण होऊन अनेक जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ५१ हजार ७६६ लोक करोनामुक्त झाले आहे.


हेही वाचा – कोरोनामुळे राजकारणीही बसले घरात, पण सर्वसामान्याना कधी कळणार?