घरमुंबईमुंबई लोकल सुरू होताच कोरोना रुग्णांमध्ये वाढ

मुंबई लोकल सुरू होताच कोरोना रुग्णांमध्ये वाढ

Subscribe

लोकलच्या वेळा कायम ठेवण्याचे पालिकेचे निर्देश

सर्वसामान्यांसाठी काही प्रमाणात लोकल सुरू केल्यानंतर सर्वच स्तरातून आनंद व्यक्त करण्यात आला. परंतु लोकल सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसांतच मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. 10 दिवसांत मुंबईतील रुग्णांच्या संख्येत 200 हून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने सावधानतेचा इशारा देत लोकलमध्ये पूर्णवेळ प्रवासाला मुभा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने राज्य सरकारने मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना 1 फेब्रुवारीपासून काही ठरावीक वेळेत लोकल प्रवास करण्याची मुभा दिली. मात्र, ही मुभा देताना कोरोना रुग्णांच्या संख्येवर सरकारने बारीक लक्ष ठेवले होते. १ ते १० फेब्रुवारीपर्यंतचा आढावा घेतल्यास दररोजच्या रुग्ण संख्येत २०० ते २२५ रुग्णांच्या संख्येत चढउतार असल्याचे आढळून आले. योग्य ती काळजी घेत लोकल प्रवासाला मुभा दिली असली तरी लोकलमधील वाढती गर्दी पाहता रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. लोकल प्रवासाला मुभा देतानाच मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

- Advertisement -

मात्र, त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी,‘सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही लोकल सुरू झाल्याने आहे, असे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, सध्या आम्ही चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या रुग्णसंख्येचा आम्ही 20 फेब्रुवारीपर्यंत आढावा घेत असल्याने लोकल प्रवासाच्या सध्या असलेल्या वेळा कायम ठेवाव्यात, त्यात कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश आम्ही रेल्वे प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -