घरताज्या घडामोडीदिलासादायक! कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत सात दिवसांपासून एकही मृत्यू नाही

दिलासादायक! कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत सात दिवसांपासून एकही मृत्यू नाही

Subscribe

एकाबाजूला राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मुंबईतील धारावीमध्ये कोरोना रुग्णांची वाढ नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी एकेकाळी कोरोना विषाणचं हॉटस्पॉट ठरली होती. परंतु आता गेल्या सात दिवसांपासून येथे एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. याशिवाय कोरोना रुग्णांची वाढ नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून नवीन रुग्णसंख्येत घट झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, धारावीत १ जूनला ३४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर ७ जूनला कोरोनाच्या १३ नव्या रुग्णांचा नोंद झाली आहे. यापूर्वी ६ जूनला १०, ५ जूनला १७ आणि ४ जूनला २३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे ही आकडेवारी पाहता धारावीत नव्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत आहे. ७ जूनपर्यंत धारावीमध्ये एकूण १ हजार ९१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ३० मे पासून म्हणजेच गेल्या सात दिवसात धारावीत एकही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

- Advertisement -

बीएमसीचे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, ‘धारावीत आक्रमक स्क्रीनिंगमुळे पॉझिटिव्ह प्रकरण कमी होण्यास मदत झाली आहे. बीएमसीचे आरोग्य कर्मचारी, खासगी दवाखाने, मोबाईल व्हॅन, महापालिकेचे दवाखाने इत्यादींनी सुमारे सहा ते सात लाख लोकांची घरोघरी जाऊन तपासणी केली.’

ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही ताप आणि इतर लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त लोकांच्या स्क्रीनिंगवर भर दिला आणि त्यांना आयसोलेट केले. आम्ही सतत चाचण्या केल्या.’ बीएमसीकडे असलेल्या आकडेवारीनुसार धारावीची ८.५ लाख लोकसंख्या आहे. ८ हजार ५०० लोकांना विविध ठिकाणी सरकारी क्वारंटाईनच्या सुविधेत ठेवण्यात आले आहे. बीएमसीने ४ हजार लोकांची तपासणी केली आहे. तर धारावीत उभारलेल्या शिबिरांच्या माध्यमातून १ हजार ३५० लोकांची तपासणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एका फोटोग्राफरमुळे गावातील लोकांना झाली कोरोनाची लागण…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -