घरताज्या घडामोडीकोरोना पॉझिटिव्ह मातेने दिला निगेटिव्ह बाळाला जन्म

कोरोना पॉझिटिव्ह मातेने दिला निगेटिव्ह बाळाला जन्म

Subscribe

एका कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीने निगेटिव्ह बाळाला जन्म दिला आहे.

गर्भवतींना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याने पोटातील बाळालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता असली तरी नानावटी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीने रविवारी निगेटिव्ह बाळाला जन्म दिला आहे.

दक्षिण मुंबईतील ३५ वर्षीय कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवतीला ३८ आठवडे पूर्ण झाल्याने तिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. १८ एप्रिलला तिचा तपासणी अहवाल आल्यानंतर उपचार सुरु असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड रुग्णांच्या प्रसूतीसाठी कोणतेही युनिट नसल्याने तिला नानावटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. गर्भवती कोव्हिड – १९ असल्याकारणाने संपूर्ण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, नानावटी हॉस्पटलने कोव्हिड – १९ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ आणि बालरोग विभाग यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय केस स्टडीज, प्रसूतीशास्त्र, स्त्री रोग विभागाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वांनुसार महिलेसाठी एक डिटेल्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केली. मातेच्या प्रसुतीनंतर बाळाला विशेष आयसोलेशन इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवले आहे. तिसऱ्या आणि आठव्या दिवशी बाळाचे कोव्हिड १९ तपासणी केली जाईल. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून ते पूर्णपणे निरोगी आहे.

- Advertisement -

संसर्ग कंट्रोल प्रोटोकॉलनुसार, विशेष प्रसूतीगृहे तयार केली असून आम्ही कर्मचाऱ्याना वैयक्तिक संरक्षण उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण दिले आहे. मातेला त्रास होऊ नये म्हणून कोव्हिड कॉरिडोर तयार केला आहे. – डॉ. सुरुची देसाई, प्रसूतिशास्त्र आणि स्त्री रोगतज्ज्ञ, नानावटी हॉस्पिटल


हेही वाचा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मार्डची मागणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -