घरCORONA UPDATEकोरोना अहवाल निगेटिव्ह नर्सेस, आरोग्य सेविका कामावर; दुसरा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

कोरोना अहवाल निगेटिव्ह नर्सेस, आरोग्य सेविका कामावर; दुसरा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Subscribe

डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याने एफ-दक्षिण विभागातील राजकमल आरोग्य केंद्र बंद करून तेथील नर्सेस व आरोग्य सेविकांची चाचणी करण्यात आली.

कोरोनाविरोधातील लढ्यातील अग्रेसर असणारा सैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य सेविकांच्या आरोग्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची बाब पुन्हा समोर आली. डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याने एफ-दक्षिण विभागातील राजकमल आरोग्य केंद्र बंद करून तेथील नर्सेस व आरोग्य सेविकांची चाचणी करण्यात आली. परंतु हे चाचणी अहवाल निगेटिव्ह येताच त्यांना कामावर बोलावण्यात आले. पुन्हा दुसऱ्यांदा त्यांची चाचणी करताच हेच अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एफ-दक्षिण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

‘एफ-दक्षिण’ विभागातील राजकमल आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरची ‘कोरोना कोविड -१९’ची चाचणी १२ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांमध्ये याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही १७ एप्रिलपर्यंत याबाबत गुप्तता बाळगत नंतर याची कल्पना त्या आरोग्य केंद्रातील नर्स, आरोग्य सेविका तसेच किटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही. त्यानंतर आरोग्य केंद्र बंद करून येथील ३ नर्स व ४ आरोग्य सेविका यांची चाचणी करण्यात आली होती. यानंतर त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह येतात त्यांना आठ दिवसांमध्ये पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश बजावण्यात आले. त्यानंतर या नर्सेस व आरोग्य सेविका कामांवर परतलेल्या असतानाच दुसरी चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले . त्यामुळे एकप्रकारे १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी निश्चित असतानाही या नर्सेस व आरोग्य सेविकांना कामावर का बोलावले गेले आणि कुणी बोलावले हा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

या नर्सेस व आरोग्य सेविकांनी कामावर परतल्यानंतर क्वारंटाईन सर्वे तसेच शिबिरातही भाग घेतला होता, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही जागेवर कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर १४ दिवसांकरता बंद ठेवून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तरी त्यांना १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून बाहेर येण्यास परवानगी अपेक्षित आहे. त्यामुळे नर्सेस व आरोग्य सेविकांना कामावर रुजून करून एकप्रकारे त्यांच्या आरोग्याची चिंता प्रशासनाना नसून दुसरीकडे हा आजारा रोखण्याऐवजी त्यांच्यामुळेच पसरवण्याचा धोका निर्माण केला जात असल्याची भीतीही काही सहकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -