घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात, महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिली...

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात, महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

Subscribe

मुंबईत सध्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण एसिम्पटोमॅटिक म्हणजेच लक्षणे नसलेले रुग्ण आढळत आहेत. केवळ ४ ते ५ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यांच्यामध्ये मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसत आहेत, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉनचे रुग्ण देखील आढळत आहेत. काल, रविवारी मुंबईत ८ हजार नव्या रुग्णांची वाढ झाली. मुंबईत अशाप्रकारची वाढती रुग्णसंख्या पाहून तिसरी कोरोनाची लाट येणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र याच दरम्यान मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईत तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे स्पष्ट करून या लाटेमध्ये कमी मृत्यूदर असल्याचे सांगितले आहे.

माध्यमांशी बोलताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, ‘सध्या ३० हजारांपेक्षा जास्त बेड्स आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी ३ हजार ५०० बेड्स ओक्युपाईड आहेत आणि उर्वरित बेड्स रिक्त आहेत. पुरेसा ऑक्सिजनसाठा, पुरेशी औषध, व्हेंटिलेटर, आयसीयू उपलब्धता, यासोबत खाड्यांची संख्या ही पुरेशी आहे. जर रुग्णसंख्या वाढली तर याचा वापर केला जाईल. सध्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण एसिम्पटोमॅटिक म्हणजेच लक्षणे नसलेले रुग्ण आढळत आहे. केवळ ४ ते ५ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यांच्यामध्ये मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसत आहेत. तसेच बोटावर मोजण्या इतपत गंभीर रुग्ण आढळत आहेत. तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये मृत्यूदर फार कमी आहे. अशी परिस्थितीत असली तरी आमची पूर्ण यंत्रणा सतर्क ठेवलेली आहे.’

- Advertisement -

दरम्यान काल पर्यावरण मंत्री यांनी मुंबईतील दैनंदिन कोरोना अहवाल ट्विट करून लिहिले होते की, ‘गेल्या २ दिवसांमध्ये महापालिकेने कोरोना अहवाल पद्धतीत बदल करून त्यात एसिम्प्टोमॅटिक रुग्ण, उपलब्ध ऑक्सिजन बेड आणि व्याप्त बेड यांची संख्या दर्शवत आहे. त्यामुळे अनावश्यक भीती टाळता येईल. घाबरण्याची गरज नसली तरी ही तिसरी लाट असल्याने पुरेपूर काळजी आणि कोरोना नियमांचे पालन करने आवश्यक आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने मदत मिळावी याकरता महापालिकेला दिवसातून दोनदा पॉझिटिव्ह अहवाल मिळतील आणि आदल्या दिवशी तपासलेले रिपोर्ट दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केले जातील.’

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai School Update: कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा पुन्हा बंद


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -