घरमुंबईशीव- वडाळ्यातील झोपडपट्टीत करोना नियंत्रणात

शीव- वडाळ्यातील झोपडपट्टीत करोना नियंत्रणात

Subscribe

पुन्हा एकदा इमारतीत जोर

करोनाच्या विषाणुचा संसर्ग निम्म्या मुंबईला झाला तरीही शीव कोळीवाडा विधानसभा क्षेत्र मोडणार्‍या महापालिकेच्या एफ-उत्तर विभागात याचा तेवढाचा परिणाम झालेला नव्हता. परंतु सुरुवातीला काही इमारतींमधून पसरलेल्या या विभागात पुढे कोरबा मिठागर, संगननगर, कोकरी पाडा, प्रतीक्षा नगर, हिंमत नगर आदी भागांमध्ये करोनाचा विषाणूचा संसर्ग अधिक पसरला आणि बाधित रुग्णांची आणि मृतांचाही आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. परंतु आता झोपडपट्टयांमधून करोना रुग्णांची कमी होवून आता पुन्हा एकदा इमारतींमधून पसार होवू लागला आहे. त्यामुळे झोपडपट्टयांमधील प्रमाण कमी झाल्याने एकप्रकारे या विभागासाठी सुखद घटना आहे.

शीव कोळीवाडा विधानसभा आणि काही अंशी वडाळा विधानसभा क्षेत्र मोडणार्‍या या एफ-उत्तर विभागात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 1994 एवढी झाली आहे. यामध्ये 877 रुग्ण बरे होवून घरी परतले असून सध्या 1003 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत या विभागात मृतांचा आकडा 114 वर पोहोचला आहे.

- Advertisement -

या विभागात कोकरी आगार, कोरबा मिठागर, पंजाबी कॉलनी, संगम नगर, कोरबा मिठागर, अ‍ॅटॉप हिल, प्रतीक्षा नगर, वडाळा व्हिलेज आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, इमारतींमधून एखाद, दुसरा रुग्ण आढळून येत होता, तोपर्यंत प्रशासनावर कोणताही ताण दिसून येत नव्हता. परंतु ज्यावेळी या आजाराने दाट झोपडपट्टी वस्तीत शिरकाव केला, तेव्हा प्रशासनातील अधिकार्‍यांची एकच पळापळ सुरु झाली. मात्र,झोपडपट्टी या आजाराने घट्ट पाय रोवलेले असतानाही, तिथून या आजाराचे समुळे उच्चाटन करण्याचा प्रयत्न प्रशासनातील अधिकारी व आरेाग्य विभागाच्या टिमने केले आहे.

महापालिकेच्या एफ-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी याबाबत सांगितले की, महापालिका विरेाधी पक्षनेते रवी राजा, आरेाग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्यासह विभागातील प्रत्येक नगरसेवकांच्या सहकार्यामुळेच आज मोठ्याप्रमाणात पसरलेला आजार काही अंशी कमी करण्यात यश आले आहे. सुरुवातीला इमारतींमधून हा आजार पसरलेला होता. त्यावर नियंत्रण मिळवत नाही तोवर झोपडपट्टी परिसरांमध्ये पसरला. परंतु आता कोरबा मिठागर असो वा हिंमत नगर, किंवा संगम नगर किंवा प्रतीक्षा नगर , कोकरी आगार असो. सर्व ठिकाणी आता रुग्णवाढीचे प्रमाण खूपच कमीवर आले आहे.

- Advertisement -

* एकूण बाधित रुग्णांची संख्या : 1994
* बरे होवून परतले रुग्ण : 877
* मृत्यू पावलेल्यांची संख्या : 114
* उपचार सुरु असलेले रुग्ण : 1003
* अतिजोखमीच्या रुग्णांसाठी जागा : क्षमता – 2700,(दाखल व्यक्ती – 1200)
* लक्षणे नसलेले पण पॉझिटिव्ह रुग्ण : क्षमता- 1750, (दाखल रुग्ण- 450)

माझ्या प्रभागात आतापर्यंत करोना बाधित रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली आहे. त्यातील 20 ते 25 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. मात्र सध्या एकही कंटेन्मेंट झोन नाही. अति जोखमीच्या लोकांसाठी पंजाबी कॉलनीजवळील एसआरए इमारतीत जागा दिली आहे. त्या लोकांकडून खाली थुंकले जाते तसेच कचरा,पाणी टाकले जाते. त्यामुळे येथील पंजाबी कॉलनीत चार ते पाच रुग्ण आढळून आले.
-नेहल शाह, नगरसेविका, भाजप.

माझ्या प्रभागात किरकोळ इमारतींमध्येच रुग्ण आहेत. मोठ्याप्रमाणात नाही. आतापर्यंत रुग्णांची संख्या 31 एवढी आहे. मात्र, रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होत नाही, हीच प्रमुख समस्या आहे. या विभागातील अनेक रुग्ण घरीच उपचार घेतात किंवा सोमय्या, रहेजा, हिंदुजा येथे उपचार घेतात. त्यामुळे खाटांची तेवढी समस्या नाही.
-राजश्री शिरवडकर, नगरसेविका, भाजप.

माझ्या प्रभागात सुरुवातीला कोकरी आगारासह काही भागात रुग्ण होते, पण आता बरे झाले आहेत. एफ-उत्तरचे सहायक आयुक्त आणि आरेाग्य विभागाची टिम योग्यप्रकारे काम करत आहेत. मात्र, खासगी प्रयोगशाळा आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय नाही.
-रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महानगरपालिका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -