घरCORONA UPDATECorona Update: मुंबईत आज ७३६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Corona Update: मुंबईत आज ७३६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Subscribe

आतापर्यंत मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही ३ लाख १६ हजार ४८७ इतकी झाली आहे.

मुंबईत आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आज मुंबईत एकूण ७३६ नव्या कोरोना रुग्णांची संख्या समोर आली आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही ३ लाख १६ हजार ४८७ इतकी झाली आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. तर मुंबईत आज ४७३ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी पोहचले आहेत. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत २ लाख ९७ हजार ९९५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आज ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ४३० मृत्यू झाला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९४ टक्के इतका आहे. गेल्या ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत कोरोनाचा ग्रोथ रेट ०.१७ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे १७ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत ३० लाख ८० हजार ५२८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना रूग्णसंख्येत होणारी वाढ पाहता महाराष्ट्रातील अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन जारी करण्यात येणार.


हेही वाचा – मुंबईकरांसाठी महापालिकेचा Alert! ५ पेक्षा जास्त रुग्ण सापडताच इमारत होणार सील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -