घरमुंबईकोरोना चाचण्या वाढवून कन्टेन्मेंट झोन लागू करा!

कोरोना चाचण्या वाढवून कन्टेन्मेंट झोन लागू करा!

Subscribe

मुख्य सचिवांच्या जिल्हा परिषदांना निर्देश

कोरोना चाचण्या वाढवून कन्टेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. तसेच कोरोनाची निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा अतिरेक न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. कुंटे यांनी शुक्रवारी राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचा जिल्हानिहाय आढावा घेतला. त्यावेळी हे निर्देश दिले आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुख्य सचिव सीताराम कुंटे सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी संवाद साधून आढावा घेत आहेत. आज त्यांनी पुणे आणि नाशिक विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा करून आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी उपस्थित होते.

- Advertisement -

कन्टेन्मेंट झोनसाठी असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरू करावी. शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करावे. तसेच नियम मोडणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करा. ज्यांना होम क्वॉरन्टीन केले आहे, त्यांचा यंत्रणेने दररोज आढावा घेऊन आरोग्य विषयक पाठपुरावा करावा, असेही कुंटे यांनी नमूद केले.

राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटिव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवा. कन्टेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना कुंटे यांनी दिल्या.

- Advertisement -

कोरोना नियमांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी ‘मी जबाबदार’ ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले. कोरोना प्रतिबंधाबाबत जिल्हा प्रशासनाला गेल्या वर्षभरापासूनचा अनुभव असून कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मैदानात उतरुन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -