घरमुंबईपुण्यासारख्या संसर्ग वाढणाऱ्या शहरात लॉकडाऊन लावा

पुण्यासारख्या संसर्ग वाढणाऱ्या शहरात लॉकडाऊन लावा

Subscribe

मुंबई हायकोर्टाचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

पुण्यासारखे ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, असा सल्ला मुंबई हायकोर्टाने दिला आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी कोर्टाने हा सल्ला देत मुंबईचा आदर्श राज्यातील इतर महापालिकांनीही घ्यायलाच हवा, असे मतही नोंदवले आहे.

राज्यात सध्या लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही जिल्ह्यांसाठी निर्बंध अधिक कठोर करत थेट लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा. पुण्यासारख्या ठिकाणी जिथे कोरोना रुग्णसंख्या फार जास्त आहे, तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे हायकोर्टाने सांगितले.

- Advertisement -

पुण्यात अ‍ॅक्टिव्ह केसेस १.४ लाख आहेत. आतापर्यंत राज्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. अन्य ठिकाणांहून पुण्यात लोक उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या जास्त असल्याचे सरकारने सांगितले. कोर्टाने यावेळी पुण्यातील संख्या चिंताजनक असल्याचे म्हटले. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे, असे मत हायकोर्टाने नोंदवले.

हायकोर्टाने यावेळी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला पाहिजे सांगत जर मुंबई मॉडेलचे सुप्रीम कोर्टाने कौतुक केले असेल तर इतर पालिकांनीही हे मॉडेल स्वीकारले पाहिजे, असा सल्ला दिला.

- Advertisement -

पुणे पालिकेचे वकील कुलकर्णी यांनी यावेळी मुंबईत चांगल्या पायाभूत सुविधा असल्याचे सांगितले. दरम्यान, पुण्यातील स्थितीवर बोलताना कोर्टाने तुमचे पालिका आयुक्त मुंबई पालिका आयुक्तांशी का बोलत नाहीत? अशी विचारणा पुणे पालिकेच्या वकिलांना केली. तुमच्याकडे अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट आहे. तुमच्याकडील पायाभूत सुविधा मुंबईसारख्या चांगल्या नसतील. पण काहीतरी केले पाहिजे, असे कोर्टाने यावेळी खडसावले.

राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या परिस्थितीबाबत माहिती देताना महाधिवक्त्यांनी सांगितले की, राज्याला सध्या दिवसाला 51 हजार रेमडेसिवीरची गरज आहे. मात्र, केंद्र सरकारकडून केवळ 35 हजार कुप्या उपलब्ध होत आहेत. आम्ही केंद्र सरकारची तक्रार करत नाही. मात्र, आमची परिस्थिती सांगत आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -