घरमुंबईसर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू

सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू

Subscribe

मुंबई गणेशोत्सव मंडळांचा पवित्रा

‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, असा पवित्रा यंदाच्या वर्षी मुंबईतील गणेश मंडळांनी घेतला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. मोठ्या गणेश मूर्ती न आणता छोट्या गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र, आता कोरोनातून राज्य सावरु लागलं आहे. अशावेळी आम्ही ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, असा पवित्रा मुंबईतील गणेश मंडळांनी घेतला आहे. तसंच त्यांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोरोनाने समाजाच्या सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम केलाय. कला, क्रीडा, राजकारण, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांमध्ये कोरोनामुळे स्थित्यंतरं पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातला प्रमुख उत्सव म्हणजे गणेशोत्सव. कोरोनाकाळात गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल झाले. सरकारने नियमावली आखून दिली. थाटामाटात उत्सव साजरा करण्याऐवजी साधेपणाने उत्सव साजरा करण्याची अनुमती दिली. यातच मोठ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्याऐवजी छोट्या मुर्ती बसवाव्यात, असा आग्रह धरण्यात आला.

- Advertisement -

मात्र, राज्य आता हळूहळू कोरोनातून सावरत आहे. विविध शहरांमधला कोरोना संसर्गाचा दर खाली येतोय. तिसर्‍या लाटेची भीती आहेच. पण अशा काळात शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करू. म्हणूनच ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, असा निर्धार मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. तसा पत्रव्यवहार गणेश मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी सुरू केला आहे.

मुंबईची ओळख असलेल्या उंच गणेशमूर्तींच्या प्रघातात कोरोनामुळे खंड पडला. परंतु यंदाच्या वर्षी ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’ असा पवित्रा मंडळांनी घेतला आहे. सरकारी नियमावलीला दिरंगाई होत असल्याने मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी मूर्तीच्या उंचीबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. गेल्या वर्षी आम्ही नियमांची अंमलबजावणी केली. अनेक ठिकाणी उत्सवात खंड पडला; पण यंदा मात्र सरकारने मंडळांची भूमिका समजून घ्यावी,’ असे मंडळांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -