Corona Vaccination: दुसऱ्या डोस प्रतिक्षेतील नागरिकांनाच लसीसाठी प्राधान्य, मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा – महापौरांचे आवाहन

बाहेर गर्दी करुन बाधित होण्यापेक्षा मेसेज आल्यावर घराबाहेर पडा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

Corona Vaccination: Citizens waiting for second dose should be given priority vaccination, get out of the house only after receiving message - Mayor Kishori Pednekar appeal
Corona Vaccination: दुसऱ्या डोस प्रतिक्षेतील नागरिकांनाच लसीसाठी प्राधान्य, मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा - महापौरांचे आवाहन

मुंबईत लसीच्या तुटवड्यामुळे आज एकूण ४४ लसीकरण केंद्र बंद करण्यात आलीत. मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी व नेस्को सेंटरवर लसीकरण केंद्राच्या बाहेर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. लसीचा साठा पुरेसा साठा नसल्याने आता केवळ लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लोकांनाच लस दिली जाणार आहे. त्यामुळे लोकांनी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पडेणेकर यांनी मुंबईकरांना केले आहे. जस जसा लसीचा मुबलक साठा उपलब्ध होईल तेव्हा लसीकरण केंद्र हळू हळू सुरु केली जातील. त्यामुळे मुंबईकरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता पालिकेला सहकार्य करा असेही महापौरांनी म्हटले आहे.

१८ वर्षांवरील लोकांना लसीकरण करण्यासाठी कोविन अँपवर नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे त्यावर नोंदणी करा. त्याचप्रमाणे ज्यांचा लसीचा दुसरा डोस आहे त्यांनीही कोविन अँपवर लसीसाठी नोंदणी केल्यावर लस घेण्यासाठी या असा मेसेज येत नाही तोवर घराबाहेर पडू नका. कोविन अँपवर रजिस्ट्रेशन करा आणि मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा. कुटुंबातील लोकांनीही आपल्या घरातील ज्येष्ठांकडे लक्ष द्या. बाहेर गर्दी करुन बाधित होण्यापेक्षा मेसेज आल्यावर घराबाहेर पडा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

मुंबईत १ मे पासून १८ वर्षांवरील लोकांसाठी होणारे लसीकरण १५ मेला करण्यात येणार असल्याचे राज्यसरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तोपर्यंत कोविन अँपवर रजिस्ट्रेशन करुन ठेवा. मधल्या काळात मुंबईत लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नव्हता मात्र आता भरगोस प्रतिसाद मिळत आहे परंतु तो काही फायदा नाही. लसीच नसल्याने सर्वांना लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. आता केवळ दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांनाच लस देण्यात येणार आहे.


हेही वाचा  – Corona Update : बीकेसी सेंटरमध्ये डॉक्टरांची वानवा; आयसीयूमध्ये आवश्यक २२१ ऐवजी ८९ डॉक्टरांकडून उपचार