Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination: मुंबईतील 'या' केंद्रांवर कोरोनाची लस संपली

Corona Vaccination: मुंबईतील ‘या’ केंद्रांवर कोरोनाची लस संपली

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. पण यामुळे कोरोना लस तुटवडा भासू लागला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना लस नसल्यामुळे मुंबईतील अनेक कोरोना केंद्र बंद करावी लागली होती. मात्र आता देखील तिच परिस्थिती उद्भवेल का? अशी चिंता वाटू लागली आहे. कारण आज मुंबईतील अनेक केंद्रावरील कोरोना लस संपल्याचे समोर आले आहे. याबाबत मुंबई महापालिकेने स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे.

मुंबईतील ‘या’ केंद्रावर कोरोनाची लस संपली

ब्रीच कॅन्डी (कंबाला हिल)
खुबचंदानी (कुलाबा)
शुश्रुषा (विक्रोळी)
एशियन हार्ट (बीकेसी)
भाटिया (ताडदेव)
सैफी (चर्नी रोड)
बालाजी (भायखळा)
मसिना (भायखळा)
रहेजा (माहीम)
गुरुनानक (वांद्रे)
ग्लोबल (परळ)
राणे रूग्णालय (चेंबूर)
देसाई रुग्णालय (मालाड)
दळवी प्रसूतीगृह (कुर्ला)
होली फॅमिली रुग्णालय (वांद्रे पश्चिम)
होली स्पिरिट रुग्णालय (अंधेरी पूर्व)
झेन रुग्णालय (चेंबूर – कोविशील्ड लसीचा साठा संपला)


- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात ८९५ कोरोना मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा, २४ तासांत वाढले ६० हजारांहून अधिक रुग्ण


- Advertisement -