Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination: ..यामुळे उद्यापासून मुंबईत १८ ते २९ वयोगटातील लसीकरण करण्यात येणार...

Corona Vaccination: ..यामुळे उद्यापासून मुंबईत १८ ते २९ वयोगटातील लसीकरण करण्यात येणार नाही

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार उद्या, सोमवारपासून संपूर्ण देशभरात मोफत लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणाच्या या नव्या टप्प्यात १८ वर्षांवरील जास्त वय असलेल्या सर्व लोकांना मोफत लस दिली जाणार आहे. केंद्र सरकार पूर्णपणे याचा खर्च उचलणार आहे. पण उद्यापासून १८ ते २९ वयोगटातील लसीकरण करण्यात येणार नाही आहे. गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने उद्यापासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यास सांगितले आहे. पण मुंबई महापालिकेच्या निर्णयानुसार, उद्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण होणार नाही आहे. पण १८ ते ४४ वयोगटातील सब गट आहे, म्हणजेच ३० वर्षांवरील व्यक्तीचे लसीकरण होणार आहे. पण १८ ते २९ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात येणार नाही आहे. यासाठी २४९ सेंटर आहेत, ज्यावरती ३० वयोगटावरील व्यक्ती जाऊ शकतील. ५० टक्के वॉकिंग सिस्टिमद्वारे तर ५० टक्के ऑनलाईन नोंदणीद्वारे हे लसीकरण होईल. ७ सेंटर राखीव असतील, ज्यामध्ये परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केले जाईल.

- Advertisement -

काही सेंटरवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाईल. पण उद्यापासून गर्दी टाळण्यासाठी १८ ते २९ वयोगटातील लसीकरण सुरू करण्यात येणार नाही आहे. दरम्यान याचा आढावा घेऊन हे लसीकरण कशा पद्धतीचे सुरू करायचे याचा निर्णय घेण्यात येईल. सध्या फक्त ३० वयोगटावरील व्यक्तीचेच लसीकरण होणार आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: गुडन्यूज! उद्यापासून देशभरात मोफत लसीकरण; CoWIN Appवर नोंदणी करणे बंधनकारक नाही


- Advertisement -