Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Vaccination: लस घ्या अन् म्हणा #Vaccinated, सेल्फी झोनसाठी BMC चा पुढाकार

Corona Vaccination: लस घ्या अन् म्हणा #Vaccinated, सेल्फी झोनसाठी BMC चा पुढाकार

कोरोना लस घेतल्यानंतरचा तुमचा क्षण आमच्यासोबत साजरा करा असे, पालिकेचे मुंबईकरांना आवाहन

Related Story

- Advertisement -

मुंबईसह राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र अपुऱ्या लसीच्या साठ्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागली. लसीबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्न आहेत. लस घ्या व कोरोनापासून सुरक्षित रहा असे आवाहन अनेक वेळा केले जाते. १ पासून १८ वर्षांवरील तरुणांना कोरोना लस दिली जाणार आहे. लसीबाबत जनजागृती व्हावी, लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने #Vaccinated हा नवा उपक्रम राबवला आहे. कोरोना लस घेतल्यानंतरचा तुमचा क्षण आमच्यासोबत साजरा करा असे, आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.

याआधीही ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील नागरिकांनीही लस घेतल्यानंतर, ‘मी कोविड लस घेतली! मी पूर्णपणे सुरक्षित आहे!’, असे लिहिलेला सेल्फी झोन प्रत्येक लसीकरण केंद्रावर तयार करण्यात आला होता. सेल्फी झोन मार्फतही लसीबाबत जनजागृती करण्यात आली. १ पासून सुरु १८ वर्षांवरील तरुणांना कोरोना लस देण्यात येणार आहे. तरुण मंडळी खास करुन सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर करतात. हाच विचार करुन पालिकेने हा नवा सोशल मीडिया उपक्रम राबवला आहे.

- Advertisement -

आपण लस घेऊन कोरोनापासून सुरक्षित होत आहोत. कोरोनाची लस घेतानाचा क्षण तुमच्याइतकाच आमच्यासाठीही खास आहे. हा क्षण आमच्यासोबत #Vaccinated हे हॅशटॅग वापरून शेअर करा व इतरांना लस घेण्यास प्रोत्साहित करा,असे ट्विट मुंबई महापालिकेने केले आहे.

पालिकेला दीढ लाख लसींचा साठा प्राप्त

- Advertisement -

बृहन्मुंबई महानगरपालिकेला दीड लाख लसींचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळे  पुढील तीन दिवस बहुतांशी केंद्रांवर होणार कोविड प्रतिबंध लसीकरण पुन्हा सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंध लसीचे १ लाख ५८ हजार डोस बृहन्मुंबई महानगर पालिकेला प्राप्त झाले आहेत.  शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.


हेही वाचा – मुंबईत सोमवारी अनेक रुग्णालयात लस पोहचलीच नाही, ठिकठिकाणी गोंधळाचे वातावरण

 

- Advertisement -