Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Vaccination: लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद

Corona Vaccination: लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद

लोकांना लस न घेताच घरी परतावे लागले

Related Story

- Advertisement -

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्यास सुरुवात  झाली आहे. मुंबईसह राज्यातही अनेक लसीकरण केंद्र ठप्प करण्यात आली आहेत. कालपर्यंत मुंबईतील बऱ्याच लसीकरण केंद्रात लसीकरासाठी गर्दी झाली होती. लसीकरणासाठी केंद्रावर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कालही अनेक लोक लस न घेताच घरी परतले. मात्र आज लसीकरण केंद्र बंद करण्यात आले. मुंबईतील नेस्को सेंटरमधील लसी संपल्यामुळे लसीकरण बंद करण्यात आले. सकाळीच लसीकरणासाठी अनेक जण लसीकरण केंद्रावर पोहचले होते. मात्र लसीकरण केंद्रावर लसी संपल्याचे पोस्टर पहायला मिळाले. त्यामुळे लोकांना लस न घेताच घरी परतावे लागले. महामारीच्या काळात राज्यात ऑक्सिजनसोबतच लसीकरणाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मुंबई गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरवरील लसीकरण केंद्र आज लसीच्या अभावी बंद करण्यात आले. लस घेण्यासाठी आलेल्या लोकांना परत पाठवण्यात आले. लसीकरण केंद्राबाहेर लोकांनी मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र लस संपली आहे लसीकरण होणार नाही. लसीकरण केंद्रसमोर गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुंबईच्या बिकेसी लसीकरण केंद्रावरही लसी नसल्याने लसीकरण बंद करण्यात आले. बीकेसी लसीकरण केंद्राच्या बाहेरही लोकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. बीकेसी हे मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र आहे. मात्र तिथेही लसीच्या तुटवड्यामुळे आज लसीकरण बंद करण्यात आले.

- Advertisement -

शनिवार आणि रविवारी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते. मात्र अनेक नागरिकांना गेल्या १-२ दिवसांपासून वारंवार परत पाठविण्यात आले. अनेक जण कालपासून लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी फेऱ्या मारत आहेत मात्र लसीचा साठा संपल्याने लसीकरण होणार नाही. त्याचप्रमाणे लसीचा पुरेसा साठा आल्यानंतर लसीकरण सुरु करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणणार्‍यांना फासावर लटकवू; उच्च न्यायालयाचा सज्जड दम

- Advertisement -

 

- Advertisement -