Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Vaccination : घरोघरी जाऊन लस देण्याचा तुर्तास विचार नाही, सध्या दुसऱ्या...

Corona Vaccination : घरोघरी जाऊन लस देण्याचा तुर्तास विचार नाही, सध्या दुसऱ्या डोसला प्राधान्य – महापौर

मुंबईतील ३७ लसीकरण केंद्र सुरु आहेत

Related Story

- Advertisement -

राज्यसह मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली. मात्र मुंबईतील तब्बल ३७ रुग्णालयात कोरोना लसीकरण सुरु असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे काही खासगी रुग्णालयातही लसीकरण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या मनात अद्यापही लसीविषयी अनेक प्रश्न आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे प्रत्येकाला आपण एकदा तरी लस घ्यावी असे वाटत आहे. मात्र सध्या तुर्तास घरी जाऊन लस देण्याचा कोणताही विचार नाही. राज्यासह मुंबईत १ मे पासून कोरोना लसीचा मुबलक साठा येण्याची शक्यता आहे. लसीचा साठा आल्यावर मुंबईतील प्रत्येक वस्तीत जाऊन लसीकरण करण्याचा विचार आहे. राज्यसरकार आणि महापालिका चांगले काम करत आहेत. त्यामुळे सध्या लसीच्या दुसऱ्या डोसाला प्राधान्य देण्यात येईल, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबईत अनेक लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. मात्र आजही मुंबईतील ३७ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु आहेत. लस घेण्यासाठी जाताना प्रत्येकाने लस आहे याची विचारपूस करुन लस घेण्यासाठी जावे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारा गोंधळ कमी होईल, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना केले. १ मे पासून लसीचा मुबलक साठा आल्यास मुंबईत कोविन अँपद्वारे रजिस्ट्रेशन करुन त्यांना लस देऊन त्यांची नोंदणी करण्याच विचार आहे. वस्ती पातळीवर जाऊन नोंदणी करुन करुनच लसीकरण करण्याचा विचार करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य असणे गरजेचे आहे.  मुंबई सर्वांच्या सहकार्याने कोविड १९ पासून सुटका मिळवण्यासाठी सज्ज आहे. त्याचप्रमाणे  मुंबईत आतापर्यंत  ३५ लाखांच्या वर लसीकरण करण्यात आले आहे. पुढील काळात दिवसाला दोन ते अडीज लाख लसीकरण करण्याचे ध्येय. त्याचप्रमाणे वस्ती पातळीवर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचा मानस असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

 

मुंबईतील ३७ लसीकरण केंद्र सुरु आहेत – महापौर 

मुंबईतील ३७ लसीकरण केंद्र सुरु असल्याची माहिती मुंबईच्या महापौरांनी दिली आहे. मुंबईत सुरु असलेली ३७ लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे –

- Advertisement -

जेजे रुग्णालय भायखळा, बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय चिंचपोकळी, केईम रुग्णालय परळ, टाटा रुग्णालय परळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट वडाळा, अकवर्थ रुग्णालय वडाळा, वरळी कोळीवाडा आरोग्य केंद्र वरळी, कांदिवीतील ईएसआयएम रुग्णालय, व्ही. एन देसाई रुग्णालय सांताक्रूझ, भाभा रुग्णालय वांद्रे, शिरोडकर प्रसुतीगृह विलेपार्ले, बाळाबाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय जोगेश्वरी , कूपर रुग्णालय जुहू, टोपीवाला दवाखाना, गोकूळधाम प्रसतिगृह गोरेगाव, मीनाताई ठाकरे रक्तपेढी कोविड लसीकरण केंद्र गोरेगाव, स.का,पाटील रुग्णालय मालाड, मालवणी सहकारी रुग्णालय मालाड, चौकसी प्रसुतिगृह मालाड, आप्पापाडा प्रसुतिगृह मालाड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली, चारकोप विभाग १ दवाखाना कांदिवली, आकुर्ली प्रसूतिगृह कांदिवली, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली, शताब्दी रुग्णालय गोवंडी, माँ रुग्णालय चेंबुर, लालबहादूर शास्री प्रसुतिगृह भांडूप, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले जनरल रुग्णालय विक्रोळी, मित्तल रुग्णालय चर्नी रोड, क्रिटीकेअर रुग्णालय अंधेरी, तुंगा रुग्णालय मालाड, शिवम रुग्णालय कांदिवली, लाईफ लाईन मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय मालाड, कोहिनूर रुग्णालय कुर्ला,ईनलॅक्स रुग्णालय चेंबूर.


हेही वाचा – Corona Vaccination : मुंबईत रविवारीही लसीकरण केंद्र सुरू राहणार, पाहा लसीकरण केंद्रांची यादी

 

- Advertisement -