Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई Covid Vaccination: गर्भवती महिलांचे आजपासून लसीकरण, राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार लसीकरणात समावेश

Covid Vaccination: गर्भवती महिलांचे आजपासून लसीकरण, राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार लसीकरणात समावेश

Related Story

- Advertisement -

मुंबईत आजपासून गर्भवती महिलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून पालिकेला बुधवारी४५ हजार लसीचे डोस मिळाले आहेत. तर, बुधवारीही पालिकेला आणखी लसीचे डोस मिळणे अपेक्षित आहे. मुंबईत जवळपास दिड लाख गर्भवती महिला असल्याचे सांगितले जात आहे. गरोदर महिलांचे कोरोना लसीकरण १९ मे २०२१ पासून सुरू करण्यात आसे असून त्यानंतर आता ‘राष्‍ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्‍लागार गट’ व ‘कोविड – 19’ लसीकरणासाठी असलेला ‘राष्‍ट्रीय तज्ज्ञ गट’ यांच्‍या शिफारशीनुसार भारत सरकारने गरोदर महिलांना ‘कोविड – 19’ लसीकरणात सहभागी केले आहे. यानुसार आजपासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३५ लसीकरण केंद्रांवर गरोदर मातांचे लसीकरण केले जाणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता इतर महिलांच्या तुलनेत गरदोर महिलांमध्ये अधिक असते. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना बाधित गरोदर महिलांमध्ये गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसूति होण्याचे प्रमाण अधिक आहे. बाधित ९० टक्के गरोदर महिलांना दवाखान्यात भरती होण्याची गरज भासत नाही. परंतु साधारण १० टक्के गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकार शक्ती विषयक औषधोपचार, डायलेसिस, हृदयरोग यामुळे कोरोना आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते तसेच त्यांची तब्येत अचनाक ढासळल्यास त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची आवश्यकता भासण्याची देखील शक्यता असते.

- Advertisement -

आजपासून सुरू होणाऱ्या गर्भवती महिलांसाठी कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख सर्वोपचार रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे व काही शासकीय रुग्णालयांमध्ये देखील हे लसीकरण करण्यात येणार आहे.

 • ए विभाग – कामा रुग्णालय, फोर्ट
 • ई विभाग – बा.य.ल. नायर धर्मार्थ रूग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई सेन्ट्रल
 • ई – जगजीवनराम पश्चिम रेल्वे रूग्णालय, भायखळा
 • ई विभाग – जे. जे. रूग्णालय, भायखळा
 • ई विभाग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रूग्णालय, भायखळा
 • एफ उत्तर विभाग – मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा
 • एफ उत्तर विभाग – लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शीव
 • एफ दक्षिण विभाग – राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय आणि सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालय, परळ
 • एफ दक्षिण विभाग – एम. जी. एम. रुग्णालय, परळ
 • एफ दक्षिण विभाग – नायगाव प्रसूतिगृह
 • जी उत्तर विभाग – माहीम सूतिकागृह, माहिम
 • जी दक्षिण विभाग – ई. एस. आय. एस. रुग्णालय, वरळी
 • एच पूर्व विभाग – विष्णूप्रसाद नंदराय देसाई मनपा सर्वसाधारण रूग्णालय, सांताक्रूझ (पूर्व)
 • एच पश्चिम विभाग – के. बी. भाभा रूग्णालय, वांद्रे (पश्चिम)
 • के पश्चिम विभाग – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कुपर रूग्णालय, जुहू – विलेपार्ले (पश्चिम)
 • के पूर्व विभाग – शिरोडकर प्रसूतिगृह, विलेपार्ले
 • एल विभाग – खान बहादूर भाभा मनपा रुग्णालय, कुर्ला भाभा, कुर्ला (पश्चिम)
 • एल विभाग – माँ साहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह, चुनाभट्टी
 • एम पूर्व विभाग – देवनार प्रसूतिगृह
 • एम पश्चिम विभाग – पं. मदनमोहन मालविय शताब्दी रूग्णालय, गोवंडी (पूर्व)
 • एम पूर्व विभाग – बी. ए. आर. सी. रुग्णालय, चेंबूर
 • एम पूर्व विभाग – आर. सी. एफ. हॉस्पिटल
 • एन विभाग – मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृह
 • एन विभाग – संत मुक्ताबाई मनपा सर्वसाधारण रुग्णालय, घाटकोपर (पश्चिम)
 • एन विभाग – सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, राजावाडी घाटकोपर (पूर्व)
 • पी उत्तर विभाग – चौक्सी प्रसूतिगृह, मालाड
 • पी उत्तर विभाग – मनोहर वामन देसाई मनपा सर्वसाधारण रूग्णालय, मालाड (पूर्व)
 • पी उत्तर विभाग – रिद्धी गार्डन मनपा दवाखाना
 • आर मध्य विभाग – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा सर्वसाधारण रूग्णालय, बोरीवली
 • आर मध्य विभाग – चारकोप विभाग 3 प्रसूतिगृह
 • आर दक्षिण विभाग – आकुर्ली प्रसूतिगृह, कांदिवली
 • आर दक्षिण विभाग – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रूग्णालय, कांदिवली (पश्चिम)
 • आर दक्षिण विभाग – इ. एस. आय. एस. रूग्णालय, कांदिवली
 • एस विभाग – एल. बी. एस. प्रसूतिगृह
 • टी विभाग – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रूग्णालय, मुलुंड (पूर्व)

कोरोना निर्बंधांमध्ये सूट नाही !

- Advertisement -