Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination: मंगळवारपासून ४५ वर्ष आणि त्यावरील वयोगटाचे निवडक केंद्रांवरच लसीकरण

Corona Vaccination: मंगळवारपासून ४५ वर्ष आणि त्यावरील वयोगटाचे निवडक केंद्रांवरच लसीकरण

४५ वर्षांवरील नागरिकांसाठी दुसरी मात्रा देणार

Related Story

- Advertisement -

मुंबईत अद्यापही अपेक्षित लस साठा उपलब्ध होत नसल्याने मुंबई महापालिकेने लसीकरणाबाबत काहीसा आखडता हात घेतला आहे. सध्या १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. लसीचा साठा कमी असल्याने निवडक केंद्रांवरच हे लसीकरण केले जाणार आहे. तसेच, ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा घेतली आहे, फक्त त्यांनाच लसीची दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.

कोविन ऍपमध्ये नोंदणी केलेल्या आणि थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांनाही लस देण्यात येईल. संबंधित केंद्रांची यादी अद्ययावत करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असून ही यादी महापालिकेच्या समाजमाध्यमांवरुन आणि प्रसारमाध्यमांतून प्रसारित करण्यात येत आहे.

- Advertisement -

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा विचार करता, सध्या सुरू असलेल्या व्यवस्थेप्रमाणे, महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिक याप्रमाणे, मंगळवारी सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेले आहे, अशा व्यक्तींसाठी असणार आहे.

या ५ लसीकरण केंद्राची नावे

- Advertisement -

(१) नायर रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर)
(२) राजावाडी (घाटकोपर परिसर)
(३) कूपर रुग्णालय (जुहू विलेपार्ले)
(४) सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी)
(५) वांद्रे- कुर्ला संकुल जम्बो कोविड सेंटर.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट


 

- Advertisement -