घरCORONA UPDATECovid-19 Vaccination: अंथरुणाला खिळलेल्यांना ३० जुलैपासून घरपोच लस मिळणार

Covid-19 Vaccination: अंथरुणाला खिळलेल्यांना ३० जुलैपासून घरपोच लस मिळणार

Subscribe

मुंबईत आजारपण आणि अपंगत्वामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांना उद्यापासून म्हणजे ३० जुलैपासून घरपोच लस मिळणार आहे. या लसीकरण मोहिमेची सुरुवात जोगेश्वरी, अंधेरी पूर्व या विभागातून होणार आहे. अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांना केंद्रावर जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेणे शक्य नसल्याने अशांसाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हे लसीकरण केले जाणार आहे. आत्तापर्यंत ४ हजार ४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे आपली नाव नोंदणी केली आहे.

मुंबईत आत्तापर्यंत ६९ लाख ६६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. यात अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खासगी केंद्रांद्वारे लसीकरण मोहिम राबवण्यात आली. तर ज्येष्ठ नागरिकांना ड्राइव्ह इन मोहिमेद्वारे लस देण्यात येतेयं. मात्र आजारपण, शारीरिक विकलांग, आणि इतर वैद्यकीय कारणांमुळे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तींच्या घरी जाऊन लस देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. घरी जाऊन लस दिल्यानंतर डॉक्टर किंवा नर्सला त्यांच्यावर काही परिणाम होत नाही हे याची दक्षता घेण्यासाठी अर्धातास थांबावे लागणार आहे.

- Advertisement -

राज्य शासनाने संपूर्ण राज्यात स्थानिक प्रशासनाला अशा नागरिकांची माहिती गोळा करत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अंथरुणाला खिळून असणाऱ्या व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण अशी माहिती [email protected] या ईमेल आयडीवर मागविण्यात आली होती. आतापर्यंत अशा ४४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे संपूर्ण साधला आहे.

मात्र यासाठी काही मार्गदर्शक सुचनाही केंद्राने दिल्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना पुढील किमान सहा महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्रं संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांना सादर करावे लागणार आहे. तसेच या व्यक्तींना कोवॅक्सिन ही लस देण्याचे निर्देश तज्ज्ञांच्या समितीने दिले आहेत.

- Advertisement -

Facebook च्या ५० टक्के युजर्सचा सर्वाधिक वेळ जातो व्हिडिओ पाहण्यात, फेसबुक सीईओंची माहिती


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -