Wednesday, April 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मागेल त्याला लस द्या, सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची मागणी

मागेल त्याला लस द्या, सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची मागणी

Related Story

- Advertisement -

किमान महाराष्ट्रासारख्या कोरोनाबाधीत राज्यांमध्ये तरी केंद्राने नियम शिथिल करून मागेल त्याला कोरोना लसदेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी केली. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांची ही मागणी योग्य असून, केंद्राने प्रारंभी किमान महाराष्ट्रासारख्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या काही राज्यांमध्ये तरी नियमात शिथिलता आणून लसीकरणाचे प्रमाण वाढवले पाहिजे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या नव्या लाटेत तरूणांमध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यामुळे आता केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा ४५ वर्षांवरील नागरिक अशी मर्यादा न ठेवता १८ वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येकासाठी मागेल त्याला लस देण्याचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला लस देण्याची परवानगी असावी, अशी मागणी केल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने कोरोना लस उत्पादकांशी चर्चा करून त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करावी आणि सुरूवातीला महाराष्ट्रासारख्या अतिबाधीत राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेसाठी अधिकाधिक लसींची उपलब्धता करून द्यावी, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.


 

- Advertisement -