Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE १ मार्चपासून लोकप्रतिनिधींना कोरोना लस देणार - महापौर

१ मार्चपासून लोकप्रतिनिधींना कोरोना लस देणार – महापौर

Related Story

- Advertisement -

येत्या १ मार्चपासून मुंबईतील लोकप्रतिनिधी यांनाही कोरोनाला रोखण्यासाठी लस देण्यात येणार आहे. मी स्वतः पालिका आरोग्य यंत्रणेकडे नाव नोंदवले असून कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मी सुद्धा कोरोनावरील लस घेणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, महापौर किशोरी पेडणेकर विविध रुग्णालयांना भेटी देत असून मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात करण्यात येणाऱ्या पूर्वतयारी कामांचा महापौरांनी उप महापौर ॲड. सुहास वाडकर यांच्यासह आज पाहणी करून संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली.

लसीबाबत नगरसेविका शीतल म्हात्रे यांची मागणी

- Advertisement -

शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी, महापौर किशोरी पेडणेकर यांना, एक पत्र पाठवून समाजात कार्यरत लोकप्रतिनिधींनाही कोरोनावरील लस देण्याची मागणी केली होती. वास्तविक, केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनाशी संबंधीत आरोग्य कर्मचारी, त्यानंतर काम करणारे फ्रंट लाईन वर्कर्स आदींना लस देण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली आहे. मात्र आम्ही जेव्हा समाजात विविध कार्यक्रमाला, उदघाटनपर कार्यक्रमासाठी जातो आणि कोरोनाबाबत जनजागृती करतो. त्यावेळी नागरिक उलट आम्हालाच विचारतात की, तुम्ही लस कधी घेणार ? असे प्रश्न विचारले जातात. त्यावर आम्हाला उत्तर देणे कठीण जाते.त्यामुळेच मी महापौर यांना एक पत्र लिहून लोकप्रतिनिधींना कोरोनावरील लस केव्हा देणार ,अशी विचारणा केल्याचे नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – त्या व्यक्तीमुळे पवार साहेबांची पावसातली सभा झाली’; सुप्रिया सुळेंनी उघडलं गुपीत


- Advertisement -

 

- Advertisement -