Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना १७ दिवस होम क्वारंटाईन सक्तीचं

लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना १७ दिवस होम क्वारंटाईन सक्तीचं

गृह विलगीकरणाचा कालावधी कमी नाही; बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

कोविड बाधित रुग्णांसाठी गृह विलगीकरण संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सुधारीत सविस्तर मार्गदर्शक सूचना नुकत्याच प्रसारित केल्या आहेत. त्यानुसार लक्षणे नसलेले बाधित (asymptomatic) किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण ह्यांनी एकूण सतरा दिवसांचा गृह विलगीकरण (home quarantine) कालावधी पाळणे आवश्यक असून त्यामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, हे प्रशासनाकडून स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे.

काही प्रसारमाध्यमांमध्ये, मुंबईत लक्षणे नसलेले बाधित (asymptomatic) किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचा गृह विलगीकरण कालावधी पूर्वीच्या १४ दिवसांऐवजी आता १० दिवस करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. ते अयोग्य आहे. उलटपक्षी सुधारीत सूचनांनुसार आता एकूण सतरा दिवस विलगीकरण पाळणे आवश्यक आहे. प्रसार माध्यमातील वृताच्या अनुषंगाने जनमानसात गैरसमज पसरू नये, म्हणून सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

- Advertisement -

लक्षणे नसलेले बाधित (asymptomatic) किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच विलग राहून आणि सोबत योग्य औषधोपचार घेवून लवकर बरे होवू शकतात. असे रुग्ण निर्देशित केल्यापासून दहा दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल. त्यासाठी संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाकडे दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देणे आवश्यक राहील. त्यानंतर त्याने इतर सर्व रुग्णांप्रमाणेच पुढील सात दिवस गृह विलगीकरण पाळणे आवश्यकच आहे. म्हणजेच दहा अधिक सात असे एकूण सतरा दिवस गृह विलगीकरण कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही सूट दिलेली नाही, ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

तसेच विलगीकरण कालावधी योग्यरीत्या पाळून सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -