घरCORONA UPDATEकोरोनाच्या उद्रेकामुळे मुंबईतील ६०० हून अधिक इमारती सील

कोरोनाच्या उद्रेकामुळे मुंबईतील ६०० हून अधिक इमारती सील

Subscribe

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे कोरोनाचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. विशेषत: मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या नियमांनुसार ज्या इमारतींमध्ये पाच आणि पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारती सील केल्या जात आहेत. त्यानुसार मुंबईत सध्या ६०० हून अधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत. दक्षिण मुंबईतील गगनचुंबी इमारती सील केल्या जात आहेत. यामुळे लक्झरी अपार्टमेंटमध्ये क्वारंटाईन झालेल्या कुटुंबांनी नागरी महामंडळाच्या व्यापक कारवाईवर प्रश्न उपस्थि केले आहेत.

शुक्रवारी टोनी कफ परेडमध्ये कारवाई करण्यात आली. तिथल्या २५ मजली जॉली मेकर -१ च्या ​ए-विंगमध्ये सुमारे १०० फ्लॅट्स आणि मेकर टॉवर-बी शुक्रवारी सील करण्यात आल्या. यापूर्वी नेपियन सी रोडवर २३ प्रकरणे उघडकीस आल्यानंतर दूतावास अपार्टमेंटस मंगळवारी सील करण्यात आले. संपूर्ण विंग सील करण्यासाठी कोविड प्रोटोकॉल पाळत आहोत, असं पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

- Advertisement -

सध्या मुंबईतील ६०० हून अधिक इमारती सील आहेत. विशेष परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही आत किंवा बाहेर जाता येणार नाही. अगदी अत्यावश्यक वस्तू या गेटवरच द्याव्या लागतात. हे १४ दिवस असणार आहे. पालिकेला जेव्हा रुग्ण सापडल्याची माहिती मिळते तेव्हा पालिकेला मजला सी करण्याची विनंती केली जात आहे.परंतु पालिकेच्या नियमानुसार ५ आणि पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळले तर संपूर्ण इमारत सील केली जात आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -