घरताज्या घडामोडीकोल्हापुरात करोना संशयिताचा मृत्यू

कोल्हापुरात करोना संशयिताचा मृत्यू

Subscribe

करोना संशयितचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडल्याचे समोर आले आहे.

करोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती १५ मार्च, रविवारी संशयित म्हणून सीपीआरमध्ये दाखल झाली होती. तसेच या संशयित असलेल्या रुग्णाचा आज अहवाल येणार होतो. मात्र, त्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

संशयित मृत व्यक्तीने ८ मार्च ते १५ मार्च दरम्यान, हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला होता, अशी माहिती काही वृत्तवाहिनीतून समोर आली होती. तसेच ही व्यक्ती मूळची हरियाणा येथे राहणारी होती, असे देखील बोले जात आहे. परंतु, ही व्यक्ती कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव इथे वास्तव्यास आली होती, अशी देखील माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

रुग्णांची संख्या ३३ वर

देश भरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०७ झाली असून त्यात महाराष्ट्रातील ३३ जणांचा समावेश आहे. तसेच ही संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावले उचलली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रविवारी मुंबईत जमावबंदी आदेश लागू केला आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच शहरात आयोजित करण्यात येणार्‍या मुंबई दर्शनसारख्या सर्व प्रकारच्या सहलींवरही बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

राज्यात होणार्‍या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएससीची परीक्षा ३० मार्चनंतर घेण्याची सूचना राज्य सरकारने संबंधितांना केली आहे.

सर्व शुटींग रद्द करण्याचा निर्णय

येत्या गुरुवारपासून ३१ मार्चपर्यंत सिनेमा, छोटा पडदा, वेबसिरीज, जाहिराती या सर्व मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घटकांचे संपूर्ण शुटींग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – मुंबईत जमावबंदी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -