घरCORONA UPDATEरूग्णांसाठी उपाययोजना, कुटुंबासाठी वेळ; आयुक्तांनी आनंदाने पार पडल्या दोन्ही जबाबदाऱ्या

रूग्णांसाठी उपाययोजना, कुटुंबासाठी वेळ; आयुक्तांनी आनंदाने पार पडल्या दोन्ही जबाबदाऱ्या

Subscribe

एन विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांची कामगिरी

महापालिकेच्या एन विभागात अर्थात घाटकोपर भागात कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता या विभागाने या आजारावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुंबईतील हा एकमेव विभाग असा होता की इथे रुग्ण आढळून आला की त्याची रुग्णालयात रवानगी करून जागा मिळवून देताना राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीची दमछाक व्हायची. पण याच विभागाचे सहायक आयुक्त अजित आंबी या विभागाची जबाबदारी सांभाळताना स्वतःची आणि आपल्या सहकाऱ्यांची विशेष काळजी घेतलीच.  पण कोरोनाच्या रुग्णांसाठी उपाययोजना करताना त्यांनी घरच्या मंडळींमध्ये अंतर पडू दिलं नाही. बाहेरून घरी परतल्यावर  केवळ अंघोळ करून जेवढी काळजी घेतली जायची तेवढीच. पण त्यानंतर मी माझ्या मुलांसह खेळत कुटुंबासह वेळ घालवून कोरोनातील क्षीण घालवायचो, असे आंबी यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

घाटकोपरच्या एन विभागात सध्या सरासरी रुग्णांची संख्या ३० ते ४० एवढी आहे. आतापर्यंत या विभागात एकूण बाधित रुग्णांची संख्या ५०३० वर पोहोचली. यातील ३३६५ एवढे रुग्ण बरे होऊन  घरी परतले. तर सध्या १४०० रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत या विभागात २९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, घाटकोपर विभागात एवढे रुग्ण मिळत असताना एन विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी  याच्या हाताशी नवखे वैद्यकीय अधिकारी असतानाही त्यांनी त्यांना सोबत घेतच कोरोनाच्या उपाययोजना सक्षमपणे केल्या. त्यांना एक ६ ते७ वर्षाचा व १३ वर्षाचा मुलगा आहे. परंतु आपली लहान मुले असताना अनेक सहायक आयुक्त मुलांशी आणि  कुटुंबातील सदस्यांशी सोशल डिस्टन्स ठेवून वागत असताना आंबी मात्र याला अपवाद होते. ते म्हणतात, कोरोनाची भीती तशी मुळात मी कधी बाळगलीच नाही. आणि माझं कुटुंबही कधी याला घाबरून गेलं नव्हतं.  एप्रिल व मे महिन्यात बाहेरून आल्यावर आंघोळ करूनच घरात वावरायचो. परंतु जून पासून आता तेवढी काळजी घेत नाही. कारण पूर्वी पेक्षा बराच भार हलका झालाय. पण पूर्वीही मी कधी स्वतंत्र खोलीत राहिलेलो नाही. तेव्हाही मुलांसोबत खेळायचो, जेवायचो, गप्पा मारायचो. त्यामुळे भीती अशी कधी वाटलीच नाही. आता हे प्रमाण कमी झाल्यानंतर मी आता तेवढी काळजी घेत नाही. बिनधास्त घरी जातो कारण पूर्वीच्या एवढा आमचा थेट सहभाग कमी झालाय. पण एक आहे, कोरोनाची भीती ही बाहेर पडल्यावर दूर होते. घाबरल्याने ती अधिक वाढते. पण हे जरी असले तरी मी माझ्या स्तरावर जी काळजी घेणे आवश्यक होते, ती घेत असतो, असे आंबी आवर्जुन सांगतात.

पूर्वी सकाळी ऑफिसला गेल्यानंतर कधी रुग्ण येईल आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते रहिवाश्यांना क्वारंटाईन करण्याचे सर्व नियोजन करेपर्यंत एवढा वेळ जायचा की डोळ्याला डोळा लावायची फुरसत नव्हती. पण माझे वैद्यकिय अधिकाऱ्यांची टीम आणि मेंटेनन्स विभागासह इतर सर्व कर्मचाऱ्यांची जी मेहनत होती, त्यामुळे आम्हाला तरी थोडासा श्वास घेता येत होता, पण माझ्या टीम मधील कर्मचाऱ्यांचे पाहिलं दोन महिने आणि आताही प्रचंड मेहनतीचे जात आहे. त्यांना जरा उसंत मिळत नाही. त्यामुळे वार्डाचा प्रमुख म्हणून जेव्हा तुम्ही आम्हाला हिरो संबोधता, तेव्हा ही बाब लक्षात आणून देणे माझे कर्तव्य आहे, आम्हाला हिरो बनवणारी खरी टीम हे माझे सहकारी व कर्मचारिवृंद आहे. घाटकोपर मधील लोकप्रतिनिधी यांचे व रहिवाश्यांचे सहकार्य यामुळे घाटकोपरचा भाग जो कोरोना बाधितांच्या  संख्येत पुढे निघून गेले होते, ते नियंत्रणात राखण्यात यश येत आहे, असे ते म्हणतात.

- Advertisement -

हे ही वाचा – मुंबई हादरली, तेरा वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -